मुंबई - वांद्रे पश्चिम येथील आग लागलेल्या माॅलसह शेजारच्या माॅलचेही सिक्युरिटी ऑडीट करण्यात आले होते का; मंजूर प्लॅन प्रमाणे बांधकाम करण्यात आले आहे का; तळघरात दुकानाला परवानगी देऊ नये असे पालिकेचे धोरण असताना परवानगी का देण्यात आली तसेच गच्चीवर हाॅटेलला परवानगी का देण्यात आली याबाबत चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज पालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे
वांद्रे येथील केएफसी या माॅल लगत असलेल्या दुकानाला आग लागून या आगीत मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. सकाळी दहाच्या सुमारास ही आग लागली प्राथमिक अंदाजा नुसार शाॅट सर्किट मुळे ही आग लागली असवी. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी आमदार अॅड आशिष शेलार हे विधान भवनात होते त्यांनी तात्काळ फायरब्रिगेड आणि पालिका आयुक्त यांच्याची दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या यंत्रणेवर लक्ष ठेवून होते. दरम्यान त्यानंतर त्यांनी तातडीने आयुक्त अजोय मेहता यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे