सर्वपक्षीय नगरसेवकांच्या मागणीनंतरही भ्रष्ट अभियंत्यावर कारवाईकडे आयुक्तांचे दुर्लक्ष - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सर्वपक्षीय नगरसेवकांच्या मागणीनंतरही भ्रष्ट अभियंत्यावर कारवाईकडे आयुक्तांचे दुर्लक्ष

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबई महानगर पालिकेच्या घाटकोपर येथील एन विभागात सहाय्यक अभियंता या पदावर कार्यरत असलेले ए. ए. आर. शेख यांच्या कार्यकाळात विभागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होत असताना सर्व पक्षीय नगरसेवकांनी शेख यांच्या बदलीची मागणी करूनही प्रशासना कडून दुर्लक्ष केले जात असल्याने प्रशासन अनधिकृत बांधकाम करणाऱ्या अधिकाऱ्याला पाठीशी घालत आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पालिकेच्या एन विभाग कार्यालयात गेले काही वर्षे दुय्यम अभियंता म्हणून ए. ए. आर. शेख हे कार्यरत होते. याच कार्यालयात शेख यांना सहाय्यक अभियंता या पदावर बढती मिळाली आहे. शेख यांच्या कार्यकाळात एन विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होऊ लागली आहेत. कित्तेक ठिकाणी रुंदी लांबी उंची वाढवून अनधिकृत बांधकाम होत असताना शेख यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. शेख यांची सहाय्यक अभियंता या पदावर ८ जून २०१२ मध्ये नियुक्ती झाली आहे. ८ जून २०१५  रोजी शेख यांचा ३ वर्षाचा कार्यकाल संपला आहे. नियमानुसार त्यांची बदली व्हायला हवी होती. परंतू शेख हे याच पदावर कार्यरत आहेत.

शेख यांची या पदावरून बदली करून घाटकोपर मध्ये अनधिकृत बांधकामे होण्यापासून रोखावे अशी मागणी प्रभाग समिती अध्यक्ष सुरेश आवळे आणि डॉ. भारती बावदाणे, प्रतिक्षा घुगे, फाल्गुनी दवे, दिपक हांडे, संजय भालेराव या सर्व पक्षीय नगरसेवकांनी आयुक्तांकडे तसेच अतिरिक्त आयुक्त पश्चिम उपनगरे यांच्याकडे लेखी निवेदना द्वारे केली आहे. शेख यांनी अनधिकृत बांधकामांना अभय दिले असल्याने त्यांच्यावर कारवाई होऊन त्यांची बदली होणे अपेक्षित असताना पालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त पश्चिम उपनगरे यांच्याकडे केलेल्या मागणीनंतरही शेख यांच्यावर कारवाई करण्यास दुर्लक्ष केले गेले आहे. पालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्याला पाठीशी घालत असल्याने सहाय्यक अभियंता शेख यांच्यावर कारवाई करून त्यांची बदली करावी यासाठी महापौर स्नेहल आंबेकर यांनी लक्ष घालावे अशी मागणी प्रभाग समिती अध्यक्ष सुरेश आवळे यांनी केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages