मुंबई / प्रतिनिधी
मुंबई महानगर पालिकेच्या परेल येथील केईएम म्हणजेच राजे एडवर्ट स्मारक रुग्णालय आहे. या रुग्णालयाला भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य (१२५ वर्षे) महोत्सवी जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी पालिका अजोय मेहता यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य दामोदर हॉल, परेल बी.आय.टी. चाळ येथे होते. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाल राज्य घटना बहाल केली आहे. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे या परिसरात असलेले वास्तव्य लक्षात घेवून बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षा निमित्त राजे एडवर्ट स्मारक रुग्णालय हे ब्रिटीश कालीन नाव काढून त्या ऐवजी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सव मेमोरिअल रुग्णालय" असे नाव द्यावे अशी मागणी विरोधी पक्ष नेते आंबेरकर यांनी केली आहे. मुंबई महानगर पालिकेतील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने मुंबईच्या व्हिक्टोरिया टर्मिनसचे नाव ब्रिटीशकालीन असल्याने छत्रपती चीवजी महाराज टर्मिनस असे केले आहे. सत्ताधाऱ्यांची ब्रिटीशकालीन नावे नको अशी भूमिका असल्याने केईएम रूग्णालयाचे नावही बदलण्यास सत्ताधाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा अशी मागणी आंबेडकरी जनतेकडून केली जात आहे.

