मुंबईकरांनी काळजी घेण्याचे पालिकेचे आवाहन
मुंबई / प्रतिनिधी (7/7/2015)
मुंबई मध्ये लेप्टोपायरेसीस मुळे जुलै महिन्यात १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. पावसाळ्यात मुंबईमध्ये ज्या ठिकाणीपावसाचे पाणी साचते अश्या ठिकाणी पाण्यामध्ये मेलेले उंदीर, उंदरांचे तसेच प्राण्यांचे वीर्य मिसळले असते. अश्या पाण्यात एखादी जखम झालेला व्यक्ती गेल्यास त्या व्यक्तीला लेप्टोपायरेसीस होऊ शकतो. यामुळे पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात जाऊ नये जर जायचे असल्यास पायात बूट घालून जावे लेप्टोपायरेसीस हा आजार चांगला होऊ शकतो यामुळे ज्या व्यक्तीला ताप, अंग व डोके दुखी होत असेल अश्या व्यक्तींनी त्वरित महापलिका रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्यावेत असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने पालिकेचे अतिरिक्त पालिका आयुक्त संजय देशमुख यांनी केले आहे.
मुंबईमध्ये जानेवारी ते जुलै २०१५ या काळात डेंग्यूचे १८१ रुग्ण, स्वाईनफ्लूचे १८४२ रुग्ण आढळले असून स्वाईनफ्लूने १८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर लेप्टोपायरेसीसचे २६ रुग्ण आढळले असून त्यापैकी जुलै महिन्यात १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये जुलै महिन्यात लेप्टोपायरेसीस मुळे १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. १२ मृत्यूपैकी ८० टक्के मृत्यू हे गोरेगाव ते दहिसर या परिसरातील असल्याने या विभागावर जास्त लक्ष देण्यात आले आहे. लेप्टोपायरेसीसचा मुकाबला करण्यासाठी पालिकेकडून उंदीर नष्ट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मुंबई मधील उंदरांची संख्या पाहता उंदीर मारण्याचे काम खाजगी कंत्राटदारांकडून करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. पावसाळ्यात उदभवणाऱ्या आजारांशी सामना करण्यासाठी पालिका सज्ज असून सर्वत्र धुम्र फवारणी केली जात आहे. आता पर्यंत ९९ टक्के डासांची उत्पत्ती रोखण्यात पालिकेला यश आल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे. मुंबईकर नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून पालिका रुग्णालयात २४ तास ओपीडी सेवा सुरु करण्यात आली आहे. पालिकेच्या १७४ दवाखान्यातही उपचाराची सोय करण्यात आली असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
गेल्या वर्षी मुंबईमध डेंग्यूचा प्रादुर्भाव होता डेंग्यूचा सामना करण्यासाठी अद्याप ८६०० टायर्स जप्त करण्यात आली असून २४ ट्रक भरतील इतक्या प्लास्टिकच्या ताडपत्र्या जप्त करण्यात आल्या आहेत. पालिकेने अद्याप ८६९२ नोटीस देण्यात आल्या आहेत. ३१४ लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून १५ लाख ५२ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. मुंबई महानगर पालिका नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवत असल्याने पालिका पुरवठा करत असलेल्या पाण्यामुळे ग्यास्ट्रो होत नाही तर रस्त्यावरील पदार्थ खाण्याने तसेच इमारतीना पुरवण्यात येणाऱ्या ट्यांकरच्या पाण्यामधून होत असल्याने रस्त्यावरील पदार्थ खाताना विशेष काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

