मुंबईतील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सर्वंकष धोरण तयार करा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईतील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सर्वंकष धोरण तयार करा

Share This
मुंबई, दि. 25
ठाण्‍यामध्‍ये वृत्तपत्र विक्रेत्‍यांना ज्‍या पध्‍दतीने महापालिकेने काही अटी व शर्तीच्‍या आधारे फुटपाथवर स्‍टॉल उभारण्‍याची परवानगी दिली आहे त्‍याच पध्‍दतीने मुंबई महापालिकेने मुंबईतील वृत्तपत्र विक्रेत्‍यांना संरक्षण देण्‍यात यावे. त्‍यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्‍यात यावे, अशी मागणी आज महापालिका आयुक्‍त अजोय महेता यांच्‍याकडे वृत्तपत्र विक्रेत्‍यांच्‍या शिष्‍टमंडळाने केली.


मुंबईतील वृत्तपत्र विक्रेत्‍यांच्‍या मागण्‍यांकडे लक्ष वेधण्‍यासाठी आज मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या नेतृत्‍वाखाली एका शिष्‍टमंडळाने पालिका आयुक्‍तांची भेट घेतली. अत्‍यावश्‍यक सेवांप्रमाणेच वृत्‍तपत्र विक्रेते काम करीत असल्‍यामुळे त्‍यांच्‍यासाठी धोरण तयार करण्‍याची मागणी यावेळी करण्‍यात आली. उपमहापौर अलका केरकर यांच्‍यासह या शिष्‍टमंडळात अजित पाटील, अजित सहस्‍त्रबुध्‍दे, शिरिष परब, जयवंत डफळे, सुशांत वेंगुर्लेकर, घनशाम यादव, संजय सानप यांचा समावेश होता.

यावेळी आयुक्‍तांना दिलेल्‍या निवेदनामध्‍ये या संघटनेने सांगितले आहे की, संपूर्ण मुंबई शहरात मुंबई-ठाणे वृत्तपत्र विक्रेता एकिकरण समिती च्या माध्यमातून वृत्तपत्र वितरीत करण्याचे काम केले जाते. मुंबईतील अनेक ठिकाणी हे वृत्तपत्र विक्रेते फुथपातवर बसून वर्तमानपत्रे विकतात. मात्र महापालिकेतर्फे त्‍यांच्‍यावर वेळोवेळी कारवाई करण्यात येते. या संदर्भात ठाणे महानगरपालिकेने ठराव पारित करून काही अटी व शर्ती च्या आधारे संरक्ष्‍ाण द्यावे, अशी मागणी त्‍यांनी केली आहे. दरम्‍यान, हे पत्र पालिका आयुक्‍तांनी पालिकेच्‍या विकास नियोजन विभागाला पाठविले असून त्‍यावर योग्‍य ती कार्यवाही करण्‍याचे निर्देश त्‍यांनी दिले आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages