मुंबई महापालिकेच्या तयारीला सुरूवात, - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई महापालिकेच्या तयारीला सुरूवात,

Share This
मुंबई: २५ ऑगस्ट
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने आतापासूनच तयारीला सुरूवात केली असून कार्यकर्त्यांच्या जिल्हा मेळाव्यांना सुरूवात केली आहे. उद्या दिनांक २६ ऑगस्टपासून पुढचे तीन दिवस मुंबईत तब्बल सहा मेळावे होणार असून त्या मेळाव्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा. श्री. अजितदादा पवार,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. सुनिल तटकरे, मा.श्री. छगन भुजबळ, मा.श्री. जयंत पाटील आणि प्रदेश प्रवक्ते मा.श्री. नवाब मलिक हे प्रमुख वक्ते असणार आहेत. बुधवारी दिनांक २६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वा. वांद्रे येथील महात्मा गांधी सभागृहात पहिला मेळावा होणार असून रात्रौ ८.३० वा. भांडूपच्या संजय दिना पाटील कार्यालयात दुसरा मेळावा पार पडणार आहे. तर गुरूवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी परेलच्या शिरोडकर हायस्कूल सभागृहात तिसरा मेळावा संध्या. ६ वा. होणार असून रात्रौ ८ वा. सायनच्या मानव सेवा संघ केंद्रात चौथा मेळावा पार पडणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी मालाड पुर्व येथील माऊली प्रसाद बिल्डींगमध्ये सायं ६ वा. पाचवा मेळावा पार पडणार असून रात्रौ ८ वा. बोरिवली पश्चिमेच्या मधुरम पार्टी हाॅल येथे सहावा मेळावा संपन्न होणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages