दप्तरांचे ओझे होणार कमी करण्यासाठी पालिका शाळांमधील आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत ट्याब - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दप्तरांचे ओझे होणार कमी करण्यासाठी पालिका शाळांमधील आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत ट्याब

Share This
मुंबई - ३ ऑगस्ट - महानगरपालिकेच्या शाळांमधील इयत्ता ८ वि च्या मराठी , उर्दू, हिंदी आणि इंगेजी या चार शाळामधील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी विद्यार्थ्याना मोफत ट्याब देण्याचा निर्णय घेण्यात आला अहे. या संबंधीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आणण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना बदलत्या काळानुसार आधुनिक शिक्षण मिळण्यासाठी आणि नवीन तंत्रज्ञान अवगत होण्यासाठी सन २०१५ - १६ या शैक्षणिक वर्षात प्रायोगिक तत्वावर ८ वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी २२ हजार ७९९ ट्याबचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये सदर ट्याब   संबंधीत शिक्षकांनाही शिक्षणही दिले जाणार अहे. तसेच सन २०१६- २०१७ मध्ये हे ट्याब याच विद्यार्थ्यांना इयत्ता ९ वी साठी ९ वीचा पाठ्यक्रम टाकून तसेच २०१७- २०१८ मध्ये इयत्ता १० वीसाठी १० वीचा पाठ्यक्रम टाकून देण्यात येणार अहे.  आठवी ते दहावी पर्यंत हि योजना राबवण्यात येणार आहे . या योजनेसाठी पालिका एकूण १० कोटी ४६ लाख ६६ हजार ३०० रुपये खर्च करणार आहे.

ट्याब वापरा बाबत शिक्षकांना, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रेजी, या चार माध्यमांच्या सर्व पाठ्यपुस्तकांमधील अभ्यासक्रमाचा  समावेश करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ट्याब पुरवण्यासाठी आणि शिक्षक, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी एकाच  कंत्राटदाराची नियुक्त करण्यात येणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages