मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या मुंबई पोलीस दलातील उपनिरीक्षकांच्या बढत्यांचे आदेश अखेर काढण्यात आले. एकूण ११९ उपनिरीक्षकांना सहाय्यक निरीक्षकपदी बढती देऊन त्यांच्या नियुक्त्या विविध पोलीस ठाण्यांत करण्यात आल्या.
वास्तविक या बढत्यांचे आदेश मे महिन्यात काढण्यात येणार होते, पण अनेक अडचणींमुळे हे आदेश काढण्याला अखेर ऑगस्ट महिना उजाडला. यामुळे बढतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकार्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन व मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी याकूब मेमन याच्या फाशीच्या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी बंदोबस्ताच्या कामात व्यस्त असल्यामुळे या बढत्यांच्या आदेशाला विलंब झाला. या सर्व बंदोबस्ताच्या कामातून मोकळे झाल्यानंतर पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी शनिवारी आपल्या कार्यालयात दिवसभर बसून उपनिरीक्षकांच्या बढत्यांचे आदेश काढले.