खड्डय़ांच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

खड्डय़ांच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक

Share This
मुंबई : पावसाळ्यात रस्त्यांवर पडणार्‍या खड्डय़ांबाबत तक्रार करण्यासाठी पालिकेने दोन टोल फ्री क्रमांक मुंबईकरांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. १२९२ आणि १२९३ या दोन टोल फ्री क्रमांकावर खड्डय़ांच्या तक्रारी नोंदवता येऊ शकतात. पालिकेने रस्त्यावर पडणार्‍या खड्डय़ांची तक्रार करण्यासाठी महानगरपालिकेने www.voiceofcitizen.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या मोबाईल अँप्लिकेशनद्वारे रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांचे फोटो नागरिक अपलोड करू शकतात. तसेच त्यांनी केलेल्या तक्रारीसंदर्भातील कार्यवाहीची सद्यस्थितीही या संकेतस्थळावर माहिती करून घेऊ शकतात. या संकेतस्थळाव्यतिरिक्त, नागरिक आपली तक्रार १९१६ या मदत सेवा टोल क्रमांकावरही नोंदवू शकतात.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages