मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) - पालिका कामगार कमॅचा-यांना लागू केलेल्या कुटूंब विमा योजनेत आता कमॅचा-यांच्या आई वडिलांचा ही या योजनेत समावेश लवकरच करण्याचा विचार पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केला आहे तसे आश्वासन आयुक्तांनी हिंदुस्थान कमॅचारी संघाच्या शिष्टमंडळाला आज दिले
पालिकेच्या कामगार कमॅचा-यांना कुटूंब विमा योजना एक ऑगस्ट 2015 पासून लागू झाली आहे. हि योजना सुरू करण्याबाबत सन 2011 पासून प्रशासन व कामगार संघटना यांच्या मध्ये चचाॅ सुरू होती 22 जुलै 2015 रोजी पालिका उपायुक्त किरण आचरेकर यांनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोब रकामगार संघटनांची बैठक आयोजित केली होती या बैठकीत हिंदुस्थान कमॅचारी संघाचे अध्यक्ष दिवाकर दळवी यांनी कामगार कमॅचा-यांच्या आई वडिलांना समाविष्ठ करावे अशी मागणी केली होती या मागणीसाठी संघाच्यावतीने आज 13 ऑगस्ट रोजी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन कामगार कमॅचा-यांच्या आई वडिलांना कुटूंब विमा योजनेत त्वरित समाविष्ट करण्याचा निर्णय घ्यावा आणि सदर योजनेची माहिती पुस्तिका काढून मराठी भाषेत प्रसिद्ध करून सवॅ कामगार कमॅचा-यांना दयावी अशी मागणी केली त्याबद्दल पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आश्वासन दिले की कुटूंब विमा योजनेत कामगार कमॅचा-यांच्या आई वडिलांना समाविष्ठ करण्याबाबत विचार करू आणि या योजनेची माहिती पुस्तिका मराठी भाषेत तयार करून कामगार कमॅचा-यांना देण्यात येईल ही आपली सूचना योग्यच आहे असे ही त्यांनी सांगितले या कामगार हिताच्या झालेल्या बैठकीत हिंदुस्थान कमॅचारी संघाचे अध्यक्ष दिवाकर दळवी यांच्या समवेत सेकेट्ररी रमेश जाधव, संजय कांबळे, रमेश गावकर हे उपस्थित होते
