आधार कार्ड सक्तीचे नाही : सर्वोच्च न्यायालय. - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आधार कार्ड सक्तीचे नाही : सर्वोच्च न्यायालय.

Share This

मंगळवार,  11 आॅगस्ट 2015
नवी दिल्ली : आधार कार्डप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला स्पष्ट बजावले आहे. तुमचे आधार कार्ड सक्तीचे नाही, याबाबत तशी जाहिरात करा, असा आदेश सर्वोच्य न्यायालयाने दिलाय.


गॅस सबसिडी (एलपीजी), रेशनचे धान्य तसेच अन्य अनुदानासाठीच आधार कार्डची सक्ती करण्यात येत आहे. मात्र, ही सक्ती करता येणार नाही. सरकारच्या अन्य योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक नाही, असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयालयाने दिलाय. त्यामुळे आधार कार्डबाबत केंद्र सरकारला मोठा झटका बसला आहे.

काही ठिकणी आधार कार्डासाठी पैसे घेतले गेल्याचे प्रकार उघड झाले आहेत. तर अनेक ठिकाणी आधार कार्डची सक्ती करण्यात येत आहे. आता ही सक्ती करण्यात येणार नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे सर्व सामान्यांना दिलासा मिळाला आहे.

आधारकार्डबाबत पाच आवश्यक गोष्टी
- सुप्रीम कोर्टाने मंगळवारी आपल्या आदेशात सांगितले की आधारकार्ड बंधनकारक नाही.
- कोणत्याही सेवेसाठी आधार कार्ड गरजेचे नाही तसेच कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी सादर करण्यास सांगितले जाऊ शकत नाही.
- केंद्र सरकारला सर्व वर्तमान पत्र, रेडिओ आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जाहिरात करावी लागेल की आधारकार्ड आवश्यक नाही.
- ऱेशन धान्य, एलपीजी आणि केरोसिनसाठी आधार कार्डचा वापर होऊ शकतो, पण ते सक्तीचे नाही.
- आधार कार्डची माहिती कोणाला देणार नाही सरकार.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages