मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) -: मुंबईकरांची पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी पालिकेने आतापर्यंत राबवलेल्या योजना अपयशी ठरल्या असताना आता पालिका हवेतील आद्रता शोषून पाणी काढण्याचा प्रयोग करणार आहे. यासाठी काँग्रेसच्या नगरसेविका सिरील डिसोझा व खुद्द महापौर स्नेहल आंबेकर यांनी कंपन्यांसाठी पुढाकार घेतला आहे. २० ते २५ लिटरची क्षमता असलेल्या या मशिन पालिकेची रुग्णालये व शाळांत उपलब्ध केल्या जाणार आहेत. एका लिटरसाठी १ रुपया २५ पैसे ते दीड रुपया असा पाण्याचा दर असणार आहे. हा संपूर्ण खर्च पालिका उचलणार आहे. स्काय वॉटर व एअर वॉटर या दोन कंपन्यांनी गटनेत्यांच्या बैठकीत या प्रकल्पाचे नुकतेच सादरीकरण केले. दरम्यान सध्या एक हजार लिटरसाठी ४ रुपये २५ पैसे खर्च येतो. त्यापेक्षा हवेतील पाण्याचा खर्च जास्त असताना तो पालिकेला कसा परवडणार अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केला आहे.
आगामी पालिका निवडणूक लक्षात घेऊन पालिकेतील सत्ताधाऱ्यंकडून वेगवेगळ्या कल्पना समोर येत आहेत. शिवसेना -भाजपची मागील १५ वर्षापासून सत्ता असतानाही मुंबईकरांची पाण्याची समस्या सोडवता आलेली नाही. पालिका प्रशासन पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंगसारख्या प्रकल्पाद्वारे पावसाचे पाणी जिरवण्याचा घेतलेला निर्णय अपयशी ठरला. यासारखे इतरही काही पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रयोग केले. पाणी गळतीवर दरवर्षी पालिका कोट्यवधी रुपयाचा चुराडा करते. मात्र त्याचा परिणाम आतापर्यंत दिसून आलेला नाही. आता थेट हवेतून पाणी जिरवण्याचा प्रयोग पालिकेकडून केला जाणार आहे. महापौरांच्या पुढाकारानेच कंपन्या आल्या असल्याने हा प्रयोग मार्गी लागण्याची शक्यता आहे. मात्र एक हजार लिटरसाठी ४ रुपये २५ खर्च येतो. मात्र हवेतून पाणी घेतल्यास एका लिटरसाठी दीड रुपया खर्च येणार आहे. शिवाय हवेतील आद्रता कमी असेल तेव्हा या पाण्याचे दर महागणार आहेत. या दोन्हींची तुलना केल्यास हवेतील पाणी पालिकेला महाग पडणार असतानाही हा प्रयोग का केला जातो? त्याबाबत नेमका उद्देश काय आहे? याबाबत प्रश्न विचारला जात असून, विरोधकांकडून याला तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे.