यंदापासून महात्मा बसवेश्‍वर सामाजिक समता पुरस्कार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

यंदापासून महात्मा बसवेश्‍वर सामाजिक समता पुरस्कार

Share This
मुंबई : सामाजिक न्याय विभागातर्फे महात्मा बसवेश्‍वर जयंती दिवशी 'महात्मा बसवेश्‍वर सामाजिक समता पुरस्कार' या वर्षापासून देण्याचा तत्त्वत: निर्णय घेतला असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी बुधवारी दिली.

सामाजिक न्यायमंत्री बडोले यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील परिषद सभागृहात बुधवारी अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेची (शिवा) विविध विषयांवर बैठक झाली. त्या वेळी बडोले बोलत होते. या वेळी सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव लोणारे, पाटील, शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे आदी उपस्थित होते. वीरशैव लिंगायत समाजातील एक संस्था व एका व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येईल. पुरस्काराचे स्वरूप, कार्यक्रमाचा तपशील यासंबंधीचा सविस्तर निर्णय लवकरच घेण्यात येईल. वीरशैव लिंगायत समाजातील काही उपजातींना इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यामध्ये आरक्षण देण्यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाकडून सविस्तर स्पष्टीकरण मागवण्याचे निर्देशही बडोले यांनी या वेळी दिले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages