मुंबई / १८ ऑगस्ट २०१५ / रशिद इनामदार
भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून धान्य चोरीचा प्रयत्न सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. बोरीवली येथील गोदामातून ही चोरी झाली होती. सुरक्षा रक्षकांनी पाठलाग करून एम एच ०४ जी आर ७७६५ हा टेम्पो ताब्यात घेतला. सध्या तो जप्त केलेला टेम्पो गोदामाच्या आवारात उभा आहे. यासंदर्भात मेवाती समाजीक संस्थेचे अध्यक्ष फारूक मेवाती यांनी लेखी तक्रार केली आहे.
दिलीप ठक्कर हा व्यापाऱ्याचा या चोरीमागे हात असल्याचे या अर्जात म्हटले आहे. दिलीप ठक्कर याने या चोरीसाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना मॉनेज केले असल्याचा संशय यातून व्यक्त करण्यात आला आहे. कळालेली हकीकत अशी , दिनांक १३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास एम एच ०४ जी आर ७७६५ हा टेम्पो दिलीप ठक्कर ने पाठवून दिला. आतमध्ये गेलेला हा टेम्पो ४ वाजता बाहेर आला. चालक अतिक ने सुरक्षा रक्षकांना टेम्पो रिकामा असल्याचे खुणावले. रक्षकांनी त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र टेम्पो थोडा पुढे आल्यावर एका खड्ड्यात आदळला. मागच्या बाजूची ताडपत्री उडाली आणि रक्षकांना संशय आला. त्यांनी टेम्पो थांबवण्यासाठी सांगितले. टेम्पो न थांबवता त्याने भरधाव वेगात पळवन्यास सुरुवात केली. सुरक्षा रक्षकांनी मोटार सायकलने पाठलाग केला. त्यांना टेम्पो पकडण्यात यश आले. तो पुन्हा गोदामात आणून त्यातील २०० पोती धान्यसाठा उतरवून घेण्यात आला. आजही टेम्पो गोदामाच्या आवारात उभा आहे. त्यापुढे काहीच झाले नाही.
या प्रकरणात म्यानेज झालेल्या अधिकाऱ्यांनी उदासीनता दाखवली आहे. या चोरीच्या संदर्भात संबंधित अधिकारी , टेम्पो चालक , वाहतूकदार किंवा व्यापारी कोणालाही अटक झालेली नाही. कोणत्याही प्रकारची चौकशी झालेली नाही. फारूक यांनी बोरीवली गोदामाच्या वरिष्ठ अधिकारी आर पी सिंह यांना दिलेल्या म्हटले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी एखाद्या पावभाजीच्या गाडीवरून पाव चोरून गुन्हेगार झालेल्या नायकाला आपण कित्येक सिनेमातून पहिले असेल. इथे मात्र बर्यापैकी साधन असलेला दिलीसेठ पैशाच्या लालसेपोटी गरीबांचा घास चोरत आहे . ही माणुसकीला काळिमा फासणारी शरमेची बाब आहे असे मत फारूक मेवाती यांनी व्यक्त केले आहे