मुंबई काँगेस तर्फे भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार दि. २० ऑगस्ट, २०१५ रोजी सकाळी ९.३० वाजता, महालक्ष्मी रेसकोर्स ते कुपरेज मैदाना पर्यंत सदभावना रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मंत्रालया जवळील कुपरेज मैदान येथील भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात येईल.
सदर सदभावना रॅलीची सुरुवात मोटर सायकलने महालक्ष्मी रेसकोर्स – ताडदेव सर्कल – नाना चौक – ग्रॅट रोड ब्रिज - लॅमिंग्टन रोड - गिरगाव चर्च- ठाकुर द्वार नाका – स. का. पाटील उद्यान - चर्नी रोड स्टेशन -मरिन लाईन्स स्टेशन – चर्चगेट - इरॉस सिनेमा मार्गे मंत्रालया जवळील कुपरेज मैदान येथे समाप्त होईल...
सदर सदभावना रॅलीचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष श्री. अशोक चव्हाण, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, AICC सरचिटणीस गुरुदास कामत, AICC सचिव प्रिया दत्त, माजी खासदार एकनाथ गायकवाड, मिलिंद देवरा, आमदार नसीम खान, वर्षाताई गायकवाड, अमिन पटेल,कालिदास कोळंबकर, भाई जगताप, मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह, मुंबई महिला कॉंग्रेस अध्यक्षा शीतल म्हात्रे, सर्वश्री माजी आमदार वसर्वश्री नगरसेवक / नगरसेविका, जिल्हाध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, महिला कॉंग्रेस, युथ कॉंग्रेस, एनएसयुआय आणि कॉंग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत...
