मुंबई उच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या वाढली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई उच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या वाढली

Share This
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित खटल्यांची संख्या वाढत असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. दरम्यान, जिल्हा आणि सत्र न्यायालयांमध्येही या वर्षी अनेक प्रकरणे वाढली असल्याचे स्पष्ट झाले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी यासंदर्भातील माहिती प्राप्त केली आहे. यातून मुंबई उच्च न्यायालय आणि नागपूर, औरंगाबाद आणि गोवा पीठांमध्ये अनेक कायदे, अधिनियमांनुसार प्रलंबित प्रकरणांची संख्या २0१0 मध्ये ३,५१,२९७ होती, २0१५ मध्ये मात्र यात वाढ होऊन ३,७६,६0४ झाली आहे. यामध्ये जिल्हा न्यायालयांच्या बाबतीत अशी माहिती समोर आली आहे की, मध्यंतरीच्या वर्षांमध्ये प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी झाली होती, परंतु २0१५ मध्ये यामध्ये बरीच वाढ झाली आहे. २0१0 मध्ये जिल्हा आणि सत्र न्यायालयांमध्ये एकूण ३९.0५ लाख प्रकरणे प्रलंबित होती, जी २0१४ मध्ये कमी होऊन २८.९६ लाख झाली होती. मात्र यंदा प्रलंबित प्रकरणांचे आकडे वाढले असून माहिती अधिकारात मिळालेल्या उत्तरानुसार यंदा जूनपर्यंत जिल्हा आणि सत्र न्यायालयांमध्ये एकूण प्रलंबित प्रकरणांची संख्या २९.५१ लाख झाली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages