मोदींच्या भाषणाकडे संयुक्त राष्ट्रांमध्ये दुर्लक्ष, अर्ध्या खुर्च्या रिकाम्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 September 2015

मोदींच्या भाषणाकडे संयुक्त राष्ट्रांमध्ये दुर्लक्ष, अर्ध्या खुर्च्या रिकाम्या

न्यूयॉर्क - पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या अमेरिका दौऱ्यात अनेक देशांच्या प्रमुखांची भेट घेत आहेत. तसेच मोठमोठ्या कंपन्यांच्या सीईओंच्या बरोबर गुंतवणुकीसंदर्भात बोलत आहेत. त्याचवेळी संयुक्त राष्ट्रांच्या ऐतिहासिक हॉलमध्ये त्यांचे भाषण ऐकायला मात्र जास्त कुणी रस दाखवल्याचे दिसले नाही. या हॉलमधील अर्ध्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या होत्या.

मोदीच्या भाषणाकडे जगभरातील अनेक नेत्यांनी पाठ फिरवल्याचे स्पष्ट दिसून आले. या भाषणाच्यावेळी मोठ्या देशांचे प्रतिनिधी हजर होते. मात्र असे काही मोजक्याच देशांचे प्रतिनिधी होते जे आपल्या द्विभाषिकासह सभागृहात उपस्थित होते. मोदींचे भाषण हिंदीमध्ये होते. त्यामुळे नेपाळ आणि पाकिस्तानच्या प्रतिनिधींखेरीच कुणाला ते समजले नसणार यात शंका नाही. त्यातही अनेक बाके रिकामीच दिसत असल्याने मोदींची लाट ओसरली की काय अशी शंकाही उपस्थित होत आहे.

Displaying IMG-20150926-WA0020.jpg
फोटो ओळ - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण सुरू असताना संयुक्त राष्ट्रांच्या सभागृहातील खुर्च्या रिकाम्या

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages