चैत्यभूमी सह विविध स्थळांची महापालिका आयुक्त अजोय मेहता यांचेकडून पाहणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

चैत्यभूमी सह विविध स्थळांची महापालिका आयुक्त अजोय मेहता यांचेकडून पाहणी

Share This
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील चैत्यभूमी सह दादर, माहिम, शीव या परिसरांतील  विविध स्थळांची महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज (दि.०८.०९.२०१५) पाहणी केली. या पाहणी दौ-याची सुरूवात चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करुन करण्यात आली. तसेच तेथील परिस्थितीची पाहणी करुन नागरी सेवा सुविधाविषयक सूचना महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिका-यांना केल्या. 

आजच्या पाहणी दौ-याप्रसंगी महापालिकेतील गटनेते (मनसे) संदीप देशपांडे, प्रभाग समिती अध्यक्षा (जी/उत्तर) श्रध्दा पाटील, उपायुक्त (परिमंडळ-२) डॉ. आनंद वागराळकर, उपायुक्त (आयुक्त) रमेश पवार, सहाय्यक आयुक्त (जी/उत्तर) शरद उघडे,  सहाय्यक आयुक्त (एफ/उत्तर) अलका ससाणे,  नगर अभियंता प्रकाश कदम तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महापालिका आयुक्तांच्या आजच्या पाहणी दौ-याची सुरुवात चैत्यभूमी येथून झाली. चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस महापालिका आयुक्तांनी अभिवादन केले. याप्रसंगी संबंधित पदाधिकारी / मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी शिवाजी पार्क दादर परिसरातील भागोजी बाळोजी कीर हिंदू स्मशानभूमीचा पाहणी दौरा केला. याठिकाणी आवश्यक ते दुरूस्ती कार्य तातडीने व योग्यप्रकारे पूर्ण करुन घेण्याचे आदेश त्यांनी जी/उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना दिले. तसेच स्मशानभूमीत असलेल्या नागरी सुविधांचीही माहिती आयुक्त महोदयांनी घेतली.

महापालिका आयुक्तांनी शिवाजी पार्क परिसराला भेट देऊन तेथील कामांची पाहणी केली.  शिवाजी पार्क येथील वर्षा जल संचयनांतर्गत करण्यात आलेल्या कामांचीही महापालिका आयुक्तांनी पाहणी केली. तसेच शिवाजी पार्क परिसरातील खुल्या व्यायाम शाळेजवळ असणा-या व नव्याने सुशोभित करण्यात आलेल्या ‘सेल्फी पॉइंट’ परिसराला देखील महापालिका आयुक्तांनी भेट दिली.


Post Bottom Ad

JPN NEWS

Pages