रविवारी बेस्टच्या विविध आगारांमधून प्रवाशांशी थेट संवाद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रविवारी बेस्टच्या विविध आगारांमधून प्रवाशांशी थेट संवाद

Share This
मुंबई : मुंबईची दुसरी लाईफ लाईन म्हटली जाणाऱ्या बेस्टची प्रवासी संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे बेस्टच्या महसुलावर त्याचा थेट परिणाम होतअसल्याने बेस्टचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी बेस्ट प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.याचाच एक भाग म्हणून प्रवाशांशी थेट भेट हा एक उपक्रम बेस्ट प्रशासनाने हाती घेतला आहे. त्यानुसार रविवार, १३ सप्टेंबर रोजी मुंबईतील बेस्टच्या विविध आगारांमधून प्रवाशांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे.
बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या मनात उपक्रमाच्या बससेवेबद्दल विश्‍वास निर्माण करून बेस्टचे उत्पन्न आणि प्रवासी वाढवण्यासाठी प्रवाशांशी थेट भेट हे प्रवासी संपर्क अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत रविवार, १३ सप्टेंबर रोजी कुलाबा, बॅकबे, सेंट्रल, वरळी, वडाळा, वांद्रे आगार, धारावी, कुर्ला, मरोळ, मजास, दिंडोशी आणि मागाठाणे या आगारांचे आगार व्यवस्थापक आणि वरिष्ठ अधिकारी सकाळी ११ वाजता आगारांमध्ये उपस्थित राहून प्रवाशांशी थेट संपर्क-संवाद साधणार आहेत. या संवादादरम्यान बससेवेसंबंधातील त्यांच्या अडचणी आणि सूचनांची नोंद घेणार आहेत. तसेच बससेवेचा स्तर सुधारण्यासाठी व प्रवासी उत्पन्नात वाढ करण्यासाठी बस प्रवाशांकडून सूचना स्वीकारण्यात येणार आहेत. बस प्रवाशांनी आणि नागरिकांनी या अभियानास हजर राहून आपल्या सूचना-अडचणी व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात आणि अभियान यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages