मुंबई पोलीस लवकरच फेसबुक, ट्विटरवर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई पोलीस लवकरच फेसबुक, ट्विटरवर

Share This
मुंबई : मुंबईकरांशी सुसंवाद साधण्यासाठी मुंबई पोलीस लवकरच ट्विटर आणि फेसबुकवर येणार असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. तसेच मुंबईकरांच्या तक्रारीवर संबंधित पोलीस ठाण्यात काय कारवाई करण्यात आली. यासाठी प्रत्येक शनिवारी तक्रारदाराला पोलीस ठाण्यात माहिती दिली जाणार असल्याचेही अहमद जावेद यांनी सांगितले. 
मुंबई पोलीस आयुक्त पदावर विराजमान झालेले अहमद जावेद हे मुंबई पोलीस दलात अनेक चांगले बदल घडवण्याचे स्वप्न घेऊन आले आहेत; परंतु चार महिन्यांनी सेवानवृत्त होत असल्यामुळे त्या कालावधीत जेवढे चांगले काम करता येईल तेवढे करणार असल्याचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी म्हटले आहे. सध्या सोशल मीडियाचे युग आहे. लोकांशी संपर्क तसेच सुसंवाद साधण्यासाठी मुंबई पोलीस फेसबुक आणि ट्विटरवर लवकरच उपलब्ध होणार असल्याचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. पोलीस दलात पारदश्रीपणा ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. मुंबईतील नागरिक हा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी जातो; परंतु त्याच्या तक्रारीचे काय झाले हे कळण्यासाठी यापुढे प्रत्येक शनिवारी संबंधित पोलीस ठाण्यातून कळवण्यात येईल, अशी सूचना पोलीस आयुक्त पोलीस ठाण्यांना दिली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages