मुंबई :
मुंबईतील ज्या वास्तुंना शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्यात येईल ती मुंबईतच नव्हे तर जगातील सर्वोत्कृष्ट हवी. शिवसेनाप्रमुखांच्या नावाप्रमाणेच हा उड्डाणपुलही सर्वोत्कृष्ट असल्याचे गौरोवोद्गार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोगेश्वरी (दक्षिण) येथील पूर्व व पश्चिमेस जोडणार्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनप्रसंगी काढले.
जोगेश्वरी पश्चिम द्रुतगती मार्गावरील पूर्व आणि पश्चिमेस जोडणार्या उड्डापुलाचे उद्घाटन गुरूवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तसेच गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर, महापौर स्नेहल आंबेकर, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर ङ्गणसे, महापालिका आयुक्त अजोय मेहता, रश्मी ठाकरे, खासदार गजानन किर्तीकर, विभागप्रमुख व आमदार सुनिल प्रभू आदि मान्यवर उपस्थित होते.
या उड्डाणपुलाला ‘ बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुल’ नाव देण्यात आले असून त्याच्या नामकरणाच्या फलकाचे अनावरणही उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुरूवातीला करण्यात आले. मुंबई शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे येथील जनतेला चांगल्या सुविधा देणे ही राज्य सरकार तसेच मुंबई महानगरपालिकेची सामुहिक जबाबदारी आहे. मुंबई महापालिका जनतेला चांगल्या दर्जाची सेवा देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. परंतु महापालिकेकडून चांगली सेवा देण्यात आली नाही, तर त्वरित टिका करण्यात येत हे चुकीचे असल्याचे मतही ठाकरे यांनी व्यक्त केले. नालेसङ्गाईच्या आरोपांबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की,‘नालेसङ्गाईची चौकशी जरूर करा. जे जे नालायक असतील त्यांना शिक्षा करा. परंतु दिल्ली तसेच अहमदाबाद येथे पाणी तुंबल्यास त्याबद्दल कोणीही बोलत नाही, असे का? हा दोष कोणाचा, असा प्रश्नही ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
सध्या सुरू असलेल्या शाकाहारी व मांसाहारी वादावर आपले मत व्यक्त करताना ते म्हणाले की,‘हा वाद कोणी सुरू केला हे सर्वप्रथम पाहणे जरूरीचे आहे. मी सर्व धर्माचा आदर करतो. परंतु आमच्या किचनमध्ये येऊन, तुम्ही तुमचा धर्म लादणार असला तर ते खपवून घेतले जाणार नाही, असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले.
यावेळी रविंद्र वायकर म्हणाले की,‘एमयुटीपीने हा पुल सुरूवातीला उभारण्यात येणार होतो. परंतु त्यांनी यातून माघार घेतल्यानंतर जनतेच्या हितासाठी २००९ मध्ये याच पुलाच्या उभारणीसाठी १३२ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली. येथील ९३० लोकांचे यशस्वीरित्या स्थलांतरही करण्यात आले. आता हा पुल वेरावलीपर्यंत नेण्याची आपली इच्छा आहे. गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या जोगेश्वरी रेल्वे स्थानकालगतच्या पादचारी पुलाचे कामही महापालिकेने त्वरित सुरू करावे, जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनपा रूग्णालयात (ट्रॉमा) अनेक सुविधांची आवश्यकता आहे, त्या पुर्ण कराव्यात, जोगश्वरीत महापालिकेने बांधलेले मार्केट सुरू करावेत, अशा सूचनाही वायकर यांनी महापालिका आयुक्तांना केल्या.
हा पुल लिकींगरोडपर्यंत विस्तारीत करण्याच्या सुचना महापालिका आयुक्तांनी दिल्या असून याबाबतचे एस्टीमेट लवकरच तयार करण्यात येईल, अशी ग्वाही अतिक्ति महापालिका आयुक्त एस. व्ही.आर श्रीनिवास यांनी यावेळी दिली.
