आदर्श ग्राम योजनेत आमदार गिरकर यांनी घेतले गाव दत्तक
मुंबई / प्रतिनिधी
रत्नागिरी िजल्ह्यतील दापोली या तालुक्याच्या िठकाणापासून केवळ अडीच किलोमीटरच्या अंतरावर वणंद गाव आहे. हे गाव अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होते. वणंद या गावाचा विकास करून सामाजिक ऋण फेडण्यासाठी आपण या गावाची निवड केल्याचे आमदार िवजय गिरकर यांनी ह्यिदव्य मराठीह्णला सांगितले.
वणंद गावात दोनशे घरे आहेत. एकुण लोकसंख्या ९१२ इतकी आहे. गाव अजूनही जिमवणे ग्रूप ग्राम पंचायतीच्या अंतर्गत येते. गावात रस्ते, पाणी, चोवीस तास वीज, आरोग्य, शिक्षण,शौचालय या सुविधा पुरवण्याला आपण प्राधान्य देणार आहोत असे आमदार िगरकर म्हणाले.
मातोश्री रमाईंचे नाव या गावाशी जुळलेले आहे. या गावातील प्रत्येक मुलास दर्जेदार आणि कौशल्य विकासावर आधारीत शिक्षण मिळवून देत हे गाव जागतिक नकाशावर झळकावण्यासाठी आपला प्रयत्न असेल असेही गिरकर यांनी सांगितले.
मुंबई / प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनसंघर्षात त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांच्या वणंद या जन्मगावाचा लवकरच कायालपालट होणार आहे. भाजपचे विधानपरिषद सदस्य आमदार भाई िवजय गिरकर वणंद गाव आमदारआदर्श ग्राम म्हणून दत्तक घेतले आहे.
रत्नागिरी िजल्ह्यतील दापोली या तालुक्याच्या िठकाणापासून केवळ अडीच किलोमीटरच्या अंतरावर वणंद गाव आहे. हे गाव अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होते. वणंद या गावाचा विकास करून सामाजिक ऋण फेडण्यासाठी आपण या गावाची निवड केल्याचे आमदार िवजय गिरकर यांनी ह्यिदव्य मराठीह्णला सांगितले.
वणंद गावात दोनशे घरे आहेत. एकुण लोकसंख्या ९१२ इतकी आहे. गाव अजूनही जिमवणे ग्रूप ग्राम पंचायतीच्या अंतर्गत येते. गावात रस्ते, पाणी, चोवीस तास वीज, आरोग्य, शिक्षण,शौचालय या सुविधा पुरवण्याला आपण प्राधान्य देणार आहोत असे आमदार िगरकर म्हणाले.
मातोश्री रमाईंचे नाव या गावाशी जुळलेले आहे. या गावातील प्रत्येक मुलास दर्जेदार आणि कौशल्य विकासावर आधारीत शिक्षण मिळवून देत हे गाव जागतिक नकाशावर झळकावण्यासाठी आपला प्रयत्न असेल असेही गिरकर यांनी सांगितले.
बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा, संघर्ष करा, हा मूलमंत्र दिला, त्यामुळे मी घडलो. त्यांचे ऋण माझ्यावर आहेत. ते फेडण्यासाठी मी वणंद गाव दत्तक घेतल्याचे त्यांनी सांगितले. पँथर चळवळीतून पुढे आलेल कोकणातील भाई गिरकर सध्या भाजपमधील ज्येष्ठ नेते आहेत. िवधानपरिषदेत पक्षाचे ते मुख्य प्रतोद म्हणून काम पाहात आहेत.
वणंदच्या ग्रामस्थांसमवेत रमाई स्मारकामध्ये िगरकर यांनी नुकतीच बैठक घेतली. बैठकीत वणंदमधील सात वाडयांतील ग्रामस्थ उपस्थित होते. यात गावाच्या आराखडयाबाबत चर्चा झाली. बैठकीला तहसिलदार कल्पना गोडे, गटविकास अधिकारी डॉ. मनीषा देवगुणे उपस्थित होते.