कत्तलखाने बंद ठेवण्याचा कालावधी कमी करा - अॅड. आशिष शेलार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कत्तलखाने बंद ठेवण्याचा कालावधी कमी करा - अॅड. आशिष शेलार

Share This
दि. 10 सप्टेंबर,
सर्वच समाजाला आपल्याला एकत्र घेऊन जायचे आहे. त्यामुळे पर्युषण काळावरून निर्माण झालेल्य वादावर आता पडदा टाकूया पूलाच्या नावावरून झालेल्या वादावर जसा आपण पडदा टाकला तसाच  पडदा या वादावर टाकूया समाजात विद्वेश निर्माण होऊ नये याची जबाबदारी  पक्षांच्या सर्व  नेत्यांची असते. असे आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज जोगेश्वरी येथे उड्डाण पूलाच्या उद्घाटनप्रसंगी  शिवसेना पक्ष प्रमूख उद्धव ठाकरे  यांच्या उपस्थितीत  केले.याच वेळी त्यांनी पर्युषण काळात कत्तलखाने बंद ठेवण्याचा कालावधी कमी करण्याचा निर्णयही महापालिकेने घ्यावा अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली.  


मी मांसाहारी असलो तरी श्रावणात मांसाहार करावा का ?  श्रावणात मांसाहार करून रस्त्यावर उतरलेले श्रावणात मांसाहार न करणाऱ्यांच्या विरोधात आहेत का असा वादही निर्माण होऊ शकतो त्यामुळे समाजात तेढ निर्माण होईल असे कोणतेही वाद निर्माण होऊ नयेत नेत्यांनी योग्य वेळी त्यावर पडदा टाकावा. नियमाप्रमाणे दोन  ते चार दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याचे अधिकार महापालिकेला आहेत. हा निर्णय काँग्रेस सरकारच्या काळात झाला आहे हा कालावधी बदलण्यासाठी  महापालिका आयुक्त यांना महापालिकेत झालेला ठराव बदलावा लागेल. त्यासाठी वेळ लागणार आहे असे आयुक्त म्हणत आहेत. हा वेळ कोणामूळे लागतो तेही आयुक्तांनी सांगावे असा सवालही त्यांनी पालिका आयुक्तांना केला. राज्यसरकारने मांसाहार बंदीचे कोणतेही आदेश दिलेले नाहीत मुख्यमंत्र्यांनी मांसाहार बंदीचा निर्णय घेतलेला नाही  कत्तलखाने बंदीचा  निर्णय महापालिकेने घेतलेला आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages