भरती प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी
मुंबई / अजेयकुमार जाधव / 14 Sep 2015
मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, नायर, सायन, नायर दंत या रुग्णालयात क्ष किरण तंत्रज्ञच्या ५१ पदाकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी २९ जून २०१५ ला परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या १६० पैकी ७२ उमेदवारांना मुलाखती बोलावण्यात आले. कागदपत्रांची पडताळणी केल्या नंतर व्यावसायिक परीक्षा घेण्यात आली. परंतू नंतर अचानक परीक्षा आणि भरती प्रक्रिया राबवणाऱ्या यंत्रणेला या परीक्षेला बसलेले काही उमेदवार आपल्या सॉफ्टवेअरमढील कोर्स मध्ये बसत असल्याचे कारण देत देवून १० उमेदवारांना परीक्षा आणि भरती प्रक्रियेमधून बाद करण्यात आले आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी या उमेदवारांनी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी मुंबई महानगर पालिकेने भारती प्रक्रियेसाठी काढलेल्या जाहिरातीमधील द्वितीय प्राधान्य या गटात यामधील १० उमेदवार बसत आहेत. या उमेदवारांनी महाराष्ट्र टेक्निकल बोर्डाची अडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल इम्याजिंग टेक्नोलॉजी हि पदवी घेतली आहे. भारतात सध्या क्ष किरण तंत्रज्ञ हाच अभ्यासक्रम अडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल इम्याजिंग टेक्नोलॉजी या नावाने शिकवला जात आहे. या उमेदवारांनी टाटा मेमोरियल रुग्णालयातून प्र्याक्टीकल केले आहे. परंतू पालिकेच्या संगणक प्रणाली मध्ये क्ष किरण तंत्रज्ञ याच अभ्यासक्रमाची नोंद असल्याने या उमेदवारांना भरती प्रक्रियेमधून बाद केले आहे. पालिकेचा क्ष किरण तंत्रज्ञ आणि महाराष्ट्र टेक्निकल बोर्डाचा अडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल इम्याजिंग टेक्नोलॉजी हा कोर्स एकच असल्याचे पत्र टाटा मेमोरीयल रुग्णालयाने पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांना दिनांक २१ / ७ / २०१५ रोजी पाठवण्यात आले होते. परंतू हे पत्र सध्या गहाळ झाल्याचे या उमेदवारांना सांगण्यात येत आहे.
संबंधित उमेदवार हे शैक्षणिक अर्हतेमध्ये दुसऱ्या प्राधान्यावर असताना त्यांच्यापेक्षा खालच्या प्राधान्य असलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रियेमध्ये पास करण्यात आले आहे. ५१ पदे भरावयाची असताना ३५ पदे भरण्यात आली आहेत. इतर पदे पालिकेच्या रुग्णालयात काम करणाऱ्या परंतू अर्हता नसलेल्यांना सामावून घेण्यासाठी रिक्त ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे पालिका रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही परीक्षा प्रक्रियेमधून जाण्याचा नियम असताना हि पदे रिक्त का ठेवली जात आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या भारती प्रक्रिये मध्ये ५ टक्के जागा खेळाडूसाठी आरक्षित असताना या जागांवर जिदनेश पवार या खेळाडूची भरती करण्यात आलेली नाही. विमुक्त मागास प्रवर्गासाठी २ जागा असताना एकच जागा भरण्यात आली आहे. एका रिक्त जागेवर स्वप्नील मेस्त्री या उमेदवाराला संधी न देत हि जागा रिक्त ठेवण्यात आली आहे. यामुळे या भारती प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ असल्याने या भरती प्रकरणाची सखोल चौकशी मारण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत नवीन गजधाने, स्वप्नील मोहिते, स्वप्नील मेस्त्री, जिदनेश पवार या उमेदवारांनी या बहती प्रकीयेची चौकशी करावी या मागणीसाठी मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्त, पालिका आयुक्त, केईएम नायर सायन रुग्णालयाच्या डीन तसेच भोईवाडा पोलिस ठाण्यात पत्र दिले आहे.
