मुंबई/ रशिद इनामदार
स्वयंपाक घरातील अपघातांच्या संख्येत हल्ली खूप वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही समस्या लक्षात घेऊन एलपीजी मुंबई रिजनचे मुख्य क्षेत्रिय व्यवस्थापक आर के तिवारी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मुंबई शहर व उपनगरांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.ज्यामुळे योग्य ती काळजी घेतली जाईल स्वयंपाकाच्या गॅसमुळे होणारे अपघात टाळले जातील.त्यासाठी त्यांनी मुंबईतील वितरकांशी चर्चा केली.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईसह उपनगरांमध्ये एचपीसीएल चे ५८ आणि बीपीसीएल चे ७२ वितरक आहेत. जे मुंबईकराना स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडर वितरीत करतात. त्यामध्ये हिन्दुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) चे सुमारे साडे दहा लाख ग्राहक आहेत.तसेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) चे सुमारे साडे तेरा लाख ग्राहक आहेत. याव्यतिरिक्त इंडियन ऑयल व इतर काही कंपन्या मुंबईकराना पाइपलाईन मार्फत गॅस पुरवठा करतात. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर हा पाईपलाइन पुरवठा केल्या जाणाऱ्या गॅसपेक्षा जास्त धोकादायक आहे.
आकडेवारी नुसार वर्ष २०१५ या वर्षात आतापर्यंत स्वयंपाकाच्या गॅस स्फोटाचे अपघात मोठ्या प्रमाणात झाले आहेत.या अपघातांमध्ये कितीतरी महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे . अलीकडेच घडलेल्या सांताक्रुज आणि खार येथील घटना ताज्या आहेत. या घटनांमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांना आपला जीव गमवावा लागला तर इतर तिघे गंभीर जखमी झाले होते. या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी एचपीसीएल, एलपीजी रीजन चे मुख्य क्षेत्रीय व्यवस्थापक आर के तिवारी यांनी जनजागृति मोहीमेची आखणी केली आहे. मुंबईतील प्रत्येक विभागातील स्थानिक वितरकांच्या सहकार्याने गॅस सिलेंडर ची देखरेख तसेच त्याच्या वापरासंबंधी सर्व माहिती देण्यात येईल, अशी माहिती तिवारी यांनी दिली.ज्यामुळे भविष्यात स्वयंपाक घरातील अपघात टाळले जातील. या मोहिमेसाठी आवश्यक ती सर्व तयारी झाली आहे. या मोहिमेची सुरुवात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल.