मुंबई १४ सप्टेंबर २०१५
मुंबई महानगरपालिकेच्या बी विभागातील इमामवाडा येथील साबुसिद्दीकी तर ट्रस्ट ला प्रसूतिगृह चालवण्यासाठी दिलेल्या जागेत सर्वसाधारण रुग्णालय ताब्यात घेण्याबाबत पालिकेने नोटीस दिली आहे. तसेच सदर रुग्णालयाकडे पालिकेकडे भरणा करण्याची साडेचार लाख रुपये भरण्याचेही कळविले अहे.
या नोटीसी नंतर सदर रुग्णालय वाचविण्यासाठी अमन कमिटीच्या काही सदस्यांनी शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती . त्यानंतर आदित्य ठाकरे आदेशानुसार आज सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी साबुसिद्दीकी रुग्णालयास भेट देऊन सद्यस्थिती समजून घेतली . यावेळी त्यांच्या बरोबर कोंग्रेसच्या नगरसेविका वकारुन्निसा याही उपस्थित होत्य.
या संदर्भात विश्वासराव यांनी सांगितले कि, प्रसुतिगृहाएवजी त्या ठिकाणी सर्वसाधारण रुग्णालय चालविले जात असले तरी जनतेला अत्यंत अल्प दारात सर्व सोयी सुविधा ट्रीटमेंट दिली जात आहे . तसेच सादर रुग्णालयात सुमारे ७०० कर्मचारी असून हे रुग्णालय बंद केले तर ते बेकार होऊ शकतात . सवलतीच्या दरात सेवा उपलप्ध होत असतील तर त्यांच्यावर दंड आकारून पालिकेने नियमात बदल करून सदर रुग्णालयात मान्यता द्यावी , अशी मागणी त्या परिसरातील लोकांची असल्याचे त्यांनी सांगितले , मात्र सदर रुग्णालयाने प्रसूतिगृह चालवण्याचा अटीवर जागा घेतली असल्याने प्रसुतिग्रुह चालविणे बंधनकारक करून इतर बाबींबाबत पालिकेने विचार करावा , असे विश्वासराव यांनी सांगितले तसेच या रुग्णालयात पालिकेच्या रुग्णांना सवलत दिली जावी अशी अट घालण्यात यावी असे त्यांनी स्पष्ट केले.
पालिकेकडून आठ रुग्णालयांना नोटीसा पालिकेच्या प्रसुतीगृहाच्या जागेवर प्रसूतिगृह चालविण्या एवजी सर्वसाधारण रुग्णालय चालविणाऱ्या आठ रुग्णालयांना पालिकेने नोटीसा दिल्या अहेत. यामध्ये बोरीवली , मुलुंड येथील अपेकस प्रसूतिगृह, मानव मंदिर आर सेन्ट्रल , नीती आर उत्तर , सुराणा पी उत्तर , तसेच गिरगाव झावबावाडी येथील अंबानी रुग्णालयास जागा भाड्याने दिल्या होत्या . यामध्ये धीरुबाई अंबानी रुग्णालयाने त्यांना दिलेली जागा खाली करून दिली असल्याचे समजते. मुंबईत पालिकेची एकूण ४८० प्रसुतुगृहे आहेत.
