गणेशोत्सवासाठी ३५ हजार मुंबई पोलीस बंदोबस्तावर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गणेशोत्सवासाठी ३५ हजार मुंबई पोलीस बंदोबस्तावर

Share This
मुंबई : गणेशोत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष तयारी केली आहे. ११ दिवस चालणाऱ्या हिंदू धर्मीय सणासाठी तब्बल ३५ हजार पोलीस रस्त्यावर बंदोबस्तासाठी लावले आहेत. 
मुंबई मध्ये ६,३४१ सार्वजनिक व १ लाख २0 हजार ७५३ घरगुती गणपती बसवले जातात. यादरम्यान, गणेशोत्सवादरम्यान हजारो लोक मुंबईत दाखल होतात. सार्वजनिक मंडळांच्या गणपतीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. गर्दीचा फायदा घेत दहशतवादी प्रवृत्ती डोके वर काढू नये, म्हणून मुंबई पोलीस गणेशोत्सवादरम्यान रात्रंदिवस खडा पहारा ठेवतात. यंदा वाहतूक पोलिसांसह ३५ हजार पोलीस गणेशोत्सवादरम्यान रस्त्यावर उतरणार आहेत. त्याबरोबरच राज्य राखीव पोलीस बल, शिघ्र कृती दल, बॉम्बशोधक- नाशक पथक, फोर्स वनचे पॅराकमांडो सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages