१८५७ भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील शहीदांच्या अभिवादन कार्यक्रमाकडे भाजपाची पाठ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 October 2015

१८५७ भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील शहीदांच्या अभिवादन कार्यक्रमाकडे भाजपाची पाठ

पालिकेतही शिवसेना भाजपा वाद चव्हाट्यावर
मुंबई / अजेयकुमार जाधव
सन १८५७ च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धातील योद्धे मंगल गडिया व सय्यद हुसेन यांना दिनांक १५ ऑक्टोबर, १८५७ रोजी आझाद मैदानात तोफेच्या तोंडी देऊन या स्वातंत्र्य वीरांना इंग्रजांनी देहांत शासन केले होते. या हुतात्म्यांना आदरांजली म्हणून महापालिका मुख्यालयासमोरील ‘‘१८५७ – भारतीय स्वातंत्र्यसंग्राम  स्मृति’’ स्मारकावर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासह शिवसेनेच्या खासदार आमदार नगरसेवक तसेच विविध मान्यवरांनी गुरुवारी (दिनांक १५ ऑक्टोबर, २०१५) आदरांजली वाहिली. पालिकेच्या या कार्यक्रमाला सत्ताधारी शिवसेना उपस्थित असताना या कार्यक्रमाकड़े भाजपाचा एकही नेता किंवा नगरसेवक फिरकला नसल्याने कार्यक्रमा ठिकाणी भाजपाच्या अनुपस्थीबाबत उलट सुलट चर्चा सुरु होती.

१८५७ च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धातील हुतात्म्यांचे मुंबईकरांना तसेच मुंबई शहरात येणाऱया पर्यटकांना स्मरण व्हावे, या उद्देशाने नगर चौकातील म्हणजेच महापालिका मुख्यालयासमोरील वाहतूक बेटावर ‘‘१८५७ – भारतीय स्वातंत्र्यसंग्राम  स्मृति’’ स्मारक महापालिकेतर्फे साकारले आहे. माजी खासदार भारतकुमार राऊत यांनी या स्मारकाच्या उभारणीसाठी रुपये २५ लक्ष इतका निधी त्यावेळी त्यांच्या खासदार फंडातून महापालिकेस दिला होता. मुंबई महानगरपालिकेद्वारे दरवर्षी या स्मारकाच्या ठिकाणी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते व लोकप्रतिनिधी यांची उपास्थिती होती. परंतू भाजपाच्या उप महापौर अलका केरकर यांचे नाव फक्त उपस्थित राहणाऱ्यांच्या यादी मधे होते. परंतू उपमहापौरही या कार्यक्रमाकडे फिरकलेल्या नाहीत.

यावेळी महाराष्ट्राचे उद्योग मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, स्थानिक खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, आमदार डॉ. अनिल परब, माजी खासदार तथा ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत, माजी आमदार रवींद्र मिर्लेकर, महापालिकेतील सभागृह नेता तृष्णा विश्वासराव, स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे, माजी महापौर श्रद्धा जाधव, नगरसेवक आणि नगरसेविका, ‘ए’ विभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर चोरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. भाजपाचा एकही पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी कार्यक्रमाकडे फिरकला नाही. यामुले  भाजपा आणि सेनेमधील आपसातील मतभेद वाढल्याने भाजपा कार्यक्रमाला अनुपस्थित राहिली अशी चर्चा होती.

Post Bottom Ad

JPN NEWS