कुलाॅ येथील काही विभागात दोन दिवस पाणी पुरवठा नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 October 2015

कुलाॅ येथील काही विभागात दोन दिवस पाणी पुरवठा नाही

बृहन्मुंबई महानगर पालिकेद्वारे एल’ विभाग पश्चिम येथे १२०० मि.मी व्यासाचीझडप बसविण्याचे काम प्रस्तावित आहे. सदर काम सोमवार दिनांक १९ ऑक्टोबर, २०१५रोजी सकाळी ८ वाजेपासून ते मंगळवार दिनांक २० ऑक्टोबर, २०१५ रोजी रात्री ८ वाजेपर्यंतहाती घेण्यात येत आहे. तेव्हा या कामाच्या कालावधीत एल’ विभाग येथील काजूपाडापाईपलाईनगुरुनानक नगरएल.बी.एस.मार्ग (महिंद्रा पार्क ते महाराष्ट्र काटाकुर्लास्थानकतकीयावाडपाईपरोडहॉल रोडन्यू मिल रोडब्राह्मणवाडीकमानीख्रिश्चनगांवस्वदेशी मील मार्गकसाईवाडाकोहिनूर इत्यादी या संपूर्ण विभागामध्ये पाणीपुरवठाहोणार नाहीनमूद केलेल्या परिसरामधील नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की,त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून अगोदरच्या दिवशी पुरेसा पाण्याचा साठा करावा व पाणी काटकसरीने वापरुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास योग्य ते सहकार्य करावेसदरहू काम पूर्ण झाल्यावर काही ठिकाणी गढूळ पाणी येऊ शकेल. नागरिकांना आवाहन करण्यात येते की,त्यांनी पाणी गाळून व उकळून वापरावे.

Post Bottom Ad

JPN NEWS