मुंबईतील रस्त्यांवर ना गतीरोधक ना झेब्रा कॉसिंग पट्टे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 October 2015

मुंबईतील रस्त्यांवर ना गतीरोधक ना झेब्रा कॉसिंग पट्टे

अपघाताचे प्रमाण वाढल्याचा सदस्यांचा आरोप
मुंबई (प्रतिनिधी)- मंबईतील काही रस्त्यांवर गतीरोधक, झेब्रा क्रॉसिंग पट्टे आखलेले नाहीत. परिणामी वाहने वेडी वाकडी धावत असून अपघात होण्याचे वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाने रस्ते बांधणीवेळी गतीरोधक आणि झेब्रा क्रॉसिंग पट्टे आखावेत, अशी मागणी सदस्यांनी स्थायी समितीत केली.

गिरगाव, भायखळा, वरळी, दादर, परळ सह उपनगरातील झोपडपट्टी भागातील काही रस्त्यांवर गतीरोधक आणि झेब्रा क्रॉसिंग पट्टे आखण्यात आलेले नाहीत. सिग्नल यंत्रणाही नसल्याने वाहनचालक वेगाने चालवत असून अपघात होत आहेत. मुंबईतील रस्त्यांकरिता कोट्यवधीचे प्रस्ताव मंजूर केले जातात. मात्र, तरीही रस्त्यांच्या दुभाजकावर झेब्रा क्रॉसिंग आणि शाळा, रुग्णालये, रहदाराच्या मार्गावर गतीरोधक बांधण्यात येत नाही, दुर्दैवाची बाब असल्याचे मत नगरसेवकांनी व्यक्त केले. बाईक चालविण्याचे मुलांमध्ये फॅड आहे. त्यातच गतीरोधक नसल्याने वाहने अतिवेगाने चालवितात. त्यामुळे अशा बाईक चालकांना लगाम घालण्यासाठी प्रशासनाने गतिरोधक तयार करावेत. ते बांधण्याची जबाबदारी सहाय्यक आयुक्तांवर टाकावी, अशी सपाचे रईश शेख यांनी केली. रस्ते बांधकामाची कंत्राटे मंजूर करायची मात्र कंत्राटदारांनी थूकपट्टी लावून काम करायची. मग अशा कंत्राटदारांना कामे का द्यायचा असा सवाल, मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केला. तर मनोज कोटक यांनी गेल्या तीन महिन्यात कंत्राटदरांनी किती व कोणत्या रस्त्यांची कामे केली याची माहिती स्थायी समितीला सादर करण्याची मागणी स्थायी समिती अध्यक्षांकडे केली.


दरम्यान, मुंबईतील रस्त्यांची कामे चांगली झाली आहेत. रस्त्यावर पडणारे खड्डे देखील दरवर्षीच्या तुलनेत कमी आहेत. मात्र, रस्त्यांवर गतीरोधक आणि झेब्रा क्रॉसिंग पट्टेबाबत चौकशी केली जाईल. ज्या रस्त्यावर असा प्रकार आढळून येईल तेथे तात्काळ गतीरोधक व झेब्रा क्रॉसिंग पट्टे आखले जातील, असा खुलासा अतिरिक्त आयुक्त श्रीनिवासन यांनी केला. 

Post Bottom Ad

JPN NEWS