मुंबई करांवर वषॅभर राहणार पाणी कपातीची टांगती तलवार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 October 2015

मुंबई करांवर वषॅभर राहणार पाणी कपातीची टांगती तलवार

मुंबई 1 Oct 2015 ( प्रतिनिधी ) - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात यंदा पाऊस कमी झाल्याने 15 टक्के पाणी साठा तलावात कमी आहे त्यामुळे मुंबईकरांना वषॅभर पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेने मुंबईकरांवर 15 टक्के पाणी कपात लागू केली असून या पाणी कपातीत कोणतीही वाढ न करता पुढे ही 15 टक्के पाणी कपात सुरु ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी आज दिली त्यामुळे मुंबईकरांना या ऑक्टोबर महिन्यातही पाणी कपातीचा सामना करावा लागणार वषॅभर पाणी कपातीची टांगती तलवार राहणार आहे हे नक्की आहे

मुंबईला मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा, आणि मध्यवैतरना या सात तलावातून पाणी पुरवठा होत आहे मात्र यंदा तलाव क्षेत्राकडे पावसाने सुरुवाती पासूनच पाठ फिरवल्यामुळे तलावात यंदा पाणी साठा बराचसा कमी आहे गणपती बाप्पाने आपल्या कालावधीत दया दाखवली त्यामुळे मेघराजाने मुंबईकरांना थोडा दिलासा दिला गणपती च्या कालावधीत तलाव क्षेत्रात चांगलाच पाऊस पडला त्यामुळे पाणी साठय़ात वाढ झाली  सध्या तलाव क्षेत्रात 11 लाख 45 हजार 001 दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध आहे गेल्या वर्षी हा पाणी साठा 14 लाख 8 हजार 547 दशलक्ष लिटर पाणी साठा होता म्हणजेच यंदा 15 टक्के पाणी साठा कमी आहे मात्र हा पाणी साठा मुंबईकराना वषॅभर पुरणार नाही त्यामुळे हा पाणी साठा मुंबईकराना वषॅभर पुरवठा करण्यासाठी पालिकेने 15 टक्के पाणी कपात पुढे ऑक्टोबर महिन्यात ही सुरू ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे या पाणी कपातीमध्ये कोणतीही अतिरिक्त वाढ सध्या केली जाणार नाही असेही पालिकेने पष्ट केले आहे 15 टक्के पाणी कपात पुढे सुरू ठेवणार असल्याची माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी दिली आहे  त्यामुळे मुंबईकरांना या पाणी कपातीचा चांगलाच सामना करावा लागणार आहे

पालिका र-थायी समिती अध्यक्षांच्या मागणीचा विचार नाहीयंदाच्या वर्षी पावसाच्या मोसमामध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमी पडल्यामुळे पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाण्याच्या साठय़ापेक्षा ३० टक्के कमी पाणीसाठा उपलब्ध होता, यास्तव बृहन्मुंबई महापालिकेने संपूर्ण मुंबई शहरात 15 टक्के पाणीकपात केली होती. त्यामुळे अनेक विभागांत नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागले. परंतु गणेशोत्सव काळात  समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे तलावक्षेत्रातील पाण्याच्या साठय़ात वाढ झालेली आहे. त्यामुळे मुंबईतील पाणीकपात तातडीने कमी करावी, अशी विनंती  फणसे यांनी महापालिका आयुक्त . मेहता यांना 23 सप्टेंबर रोजी केली होती मात्र तलाव क्षेत्रात त्यानंतर पाऊस न पडल्यामुळे तलाव क्षेत्रात 15 टक्के पाणी साठा कमी आहे त्यामुळे हा पाणी साठा मुंबईकराना वर्षभर पुरु शकत नसल्यामुळे आणि पाऊस म्हणावा तसा पडला नाही त्यामुळे र-थायी समिती अध्यक्षांच्या पाणी कपात कमी करण्याच्या मागणीचा विचार पालिकेने केला नाही अशी माहिती पालिका जलविभागातून देण्यात आली

Post Bottom Ad

JPN NEWS