"सत्ताधारी असतानाही भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या महापौर कौतुकास पात्र' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 October 2015

"सत्ताधारी असतानाही भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या महापौर कौतुकास पात्र'


महापौरांचे अभिनंदन करण्यासाठी सचिन अहिर यांची महापौर निवासाला भेट
मुंबई ऑक्टोबर
मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात येणाऱ्या रस्ते बांधणीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचीकबुली देत आयुक्तांमार्फत त्याची चौकशी करण्याची मागणी केल्याबद्दलमुंबईच्या महापाैर स्नेहल आंबेकर यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहेअशीभावना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मा.श्रीसचिन अहिर यांनी व्यक्त केलीआहेसत्ताधारी असून सुद्धा खुद्द महापौरांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल त्यांचेअभिनंदन करण्यासाठी माअहिर यांनी गुरूवारी दुपारी महापौर निवासस्थानीत्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केलामात्र त्यांची भेट महापौरांनी नाकारल्यानेमहापौर निवासस्थानाच्या बाहेर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.

कही दिवसांपुर्वी मुंबईतल्या नालेसफाईत शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची बाबखुद्द आयुक्तांच्या अहवालाद्वारे उघड झाल्याचे सांगत माअहिर म्हणाले की,नालेसफाई आणि रस्ते बांधणीच नव्हे तर महापालिकेच्या जवळपास प्रत्येकविभागात मोठा भ्रष्टाचार आहेही बाब आम्ही गेली अनेक वर्षे सांगत आहोत.आता महापौरांच्या पत्र प्रपंचावरून त्यावर शिक्कामोर्तबच झाले आहेमात्र हासगळा प्रकार पाहून आपल्याला असा प्रश्न पडला आहे कीशिवसेना आणि भाजपहे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र असूनही एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप का करतआहेतएक प्रकारे विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी सत्ताधारीच घेतआहेतअसा टोला लगावत सत्तेत असूनही घोटाळे होतातच कसे असा खोचकसवालही त्यांनी केला.

अचानक हे दोन्ही पक्ष एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप का करत आहेत याप्रश्नावर बोलताना माअहिर म्हणाले कीमहापालिकेत सत्ताधारी असलेलेशिवसेना आणि भाजप एकमेकांचे घोटाळे उघड करत आहेतकारण त्यांनामिळणाऱ्या वाट्यात आता घाटा होऊ लागला असावाकंत्राटदारांकरून मिळणाऱ्याटक्केवारीतील आपला हिस्सा आपला मित्र पक्ष हडप करतोय की काय अशी भीतीदोघांनाही वाटत असल्याने हे घडत असावेभाजपाच्या दुटप्पी धोरणावरही त्यांनीयावेळी टीका केलीते म्हणाले कीशिवसेनेशी राजकीयदृष्ट्या बिनसल्यावरभाजपचे नेते आता भ्रष्टाचार खणून काढण्याचा संकल्प करत आहेतमगआतापर्यंत होत असलेल्या भ्रष्टाचाराला त्यांची मुक संमती होती कायाचे उत्तरभाजपाच्या नेत्यांनी द्यायला हवे

महापौरांच्या पत्राबाबतही त्यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केलेते पत्र कुठेटाईप झाले याचा शोध घेणे गरजेचे अाहेतकारण कंत्राट  मिळाल्याच्यारागातून एका कंत्राटदारानेच ते तयार केल्याचा आरोप होत अाहेत्यामुळे त्याचीप्रशासनाने चौकशी करावी असे लेखी पत्रच आपण महापालिका आयुक्तांना देणार असल्याचे सांगत त्यांनी पुनश्च महापौरांच्या धाडसाचे कौतुक केले.

Post Bottom Ad

JPN NEWS