दहशतवादी हल्ल्याचा धोका कायम - जावेद अहमद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दहशतवादी हल्ल्याचा धोका कायम - जावेद अहमद

Share This

मुंबई - पॅरिसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईवरही हल्ल्याचे सावट कायम असल्याचे मुंबई पोलिस आयुक्त अहमद जावेद यांनी सांगितले. हा धोका कायम असला तरी मुंबई पोलिस त्याचा सामना करण्यासाठी समर्थ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. "इंडियन मर्चंट चेंबर्स‘च्या वतीने "सायबर सुरक्षा‘ या विषयावर बुधवारी (ता. 25) आयोजीत चर्चासत्रात जावेद बोलत होते. 
दहशतवाद हा चिंतेचा विषय आहे. "इसिस‘सारख्या दहशतवादी संघटना या 16-18 वर्षांच्या तरुणांची माथी भडकवतात. दहशतवादी बनण्यासाठी गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्‍वभूमी असायलाच हवी, असे नाही. खरे तर मुलांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पालकांची असल्याचे मत जावेद यांनी व्यक्त केले. फ्रान्सवर झालेला हल्ला आणि 2008 मध्ये मुंबईवरचा हल्ला पाहिल्यास त्यात बरेचसे साधर्म्य आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. फ्रान्समधील हल्ल्यानंतर अशा प्रकारच्या हल्ल्याचा मुंबईला धोका कायम आहे. हल्ला टाळण्यासाठी आम्ही योग्य ती खबरदारी घेत आहोत, असे जावेद यांनी स्पष्ट केले.

असहिष्णुतेच्या मुद्द्यावर वक्तव्य केल्याने अभिनेता आमीर खान टीकेचा धनी झाला आहे. मंगळवारी (ता. 24) एका संघटनेने त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. त्याला योग्य ती सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. त्याच्या सुरक्षेचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages