पालिकेत रद्दी भ्रष्टाचार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 November 2015

पालिकेत रद्दी भ्रष्टाचार

मुंबई - रद्दीतून पैसे मिळतात; मात्र मुंबई महापालिकेने रद्दी विकून पैसे मिळवण्याऐवजी रद्दी विकण्यासाठीच दहा लाख रुपये मंजूर केले आहेत. पालिकेच्या कार्यालयातून रद्दी दुकानापर्यंत नेण्यासाठी हे दहा लाख मोजण्यात येणार आहेत. 

या रद्दीविक्रीच्या खर्चाचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीत शुक्रवारी (ता.27) मंजुरीसाठी आला आणि रद्दी कार्यालयातून दुकानापर्यंत नेण्यासाठी दहा लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती उघड होताच रद्दीविक्रीतही भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप समिती सदस्यांनी केला. विरोधी सदस्यांच्या तीव्र विरोधानंतरही हा प्रस्ताव मंजूर झाला हे विशेष.

महापालिकेच्या स्थायी समितीतील भ्रष्टाचाराचे धिंडवडे यापूर्वी मंत्रालयापर्यंत निघाले आहेत. या स्थायी समितीत आज रद्दीची विल्हेवाट लावण्यासाठीचा 10 लाखाचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला होता. पालिकेतील रद्दी दुकानापर्यंत पोचवण्यासाठी दहा लाख खर्च येणार आहे. कुठे आणि कसा पैसा कमवायचा याची शक्कल पालिकेच्या अधिकाऱ्यांनी लढवल्याची चर्चा या प्रस्तावामुळे सुरू झाली आहे. पालिकेच्या कार्यालयातील रद्दी विक्रीविषयी चार-पाच रद्दी दुकानदारांना कळवले असते, तर त्यांनी रद्दी फुकटात उचलून नेली असती. मात्र रद्दी उचलण्यासाठी इतक्‍या मोठ्या रकमेची निविदा काढणे म्हणजे खाबूगिरी असल्याचा आरोप कॉंग्रेसचे सदस्य प्रवीण छेडा यांनी केला. सर्वपक्षीय सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध केला; परंतु हा प्रस्ताव अखेर मंजूर झाला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad