भारतीय संविधान दिनानिमित्त मंत्रालयात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भारतीय संविधान दिनानिमित्त मंत्रालयात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

Share This
मुंबई : भारतीय संविधानाबाबत जनजागृती आणि सर्व नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी याकरिता मंत्रालयात गृह व संसदीय कार्य राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
याप्रसंगी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, अपर मुख्य सचिव डॉ.पी.एस.मीना, अपर मुख्य सचिव (सेवा) भगवान सहाय, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव राजेंद्र जाधव, अवर सचिव र. ग. पांचाळ यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages