लोकलमधील प्रवाश्यांवर दगफेकीच्या १० महिन्यात १३ घटना - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लोकलमधील प्रवाश्यांवर दगफेकीच्या १० महिन्यात १३ घटना

Share This

मुंबई - मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलच्या रुळाजवळील झोपडपट्ट्यांतून प्रवाशांवर दगडफेकीचे प्रकार वाढू लागले आहेत. सन २०१५ मधील पहिल्या १० महिन्यांत दगडफेकीच्या १३ घटना घडल्या आहेत. यातल्या एका प्रकरणाचा उलगडा झाला आहे. गेल्या सहा वर्षांत सात प्रवाशांना डोळा गमवावा लागला आहे. सन २००९ ते २०१३ या पाच वर्षात दगडफेकीच्या ७६ घटना घडल्या असून त्यापैकी फक्त सातच घटना उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे. 
लोकलने ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र या प्रवाश्यांना हवी तशी सुरक्षा मिळत नाही. तिन्ही मार्गावर जवळ रेल्वे रुळालगतच्या वाढत्या झोपडपट्या या प्रवाशांना त्रासदायक ठरत आहेत. नुकताच मुलुंड-नाहूर स्थानकांदरम्यान दगडफेकीत तरुण जखमी झाला होता. बहुतांश झोपडपट्ट्या रुळालगत असल्याने त्यांच्यावर शहर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे असते. दगडफेकीचे प्रकार रोखण्यासाठी मोहल्ला कमिटीच्या मदतीने जनजागृती केली जाते; पण त्याचा फारसा परिणाम होत नाही. अनेकदा झोपडपट्ट्यांमधील नागरिक दगडफेक करणाऱ्यांना पाठिशी घालतात यामुळे दगडफेक करणाऱ्यांना अटक करता येत नाही. जखमी प्रवासी पोलिसांत तक्रार करत नसल्याने अनेक घटना निदर्शनास येत नाहीत. रेल्वे पोलिसांच्या नोंदीनुसार दगडफेकीच्या घटना मध्य आणि हार्बर मार्गावर घडल्या आहेत. मध्य रेल्वेच्या कुर्ला, ठाणे, कल्याण येथे दगडफेकीच्या घटना घडल्याची नोंद आहे. हार्बर रेल्वेच्या वडाळा येथे झालेल्या दगडफेकप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. 

यंत्रणा एकत्र काम करणार
दगडफेकीच्या घटना गंभीर आहेत. त्या रोखल्या जाऊ शकतात. रुळांभोवती गस्त वाढवण्यात येणार असून झोपड्यांवर कारवाईसाठी स्थानिक पोलिसांना विनंती केली आहे. ही सर्व यंत्रणा एकत्र काम करणार आहे. दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
-मधुकर पाण्डेय, रेल्वे पोलिस आयुक्त. 

दगडफेकीच्या घटना 
पोलिस ठाणे घटना  उघडकीस आलेली घटना 
कुर्ला       4       0
ठाणे       4       0
कल्याण    2       0
वडाळा     1       1
दादर      1       0
वाशी      1       0
(आकडेवारी ऑक्‍टोबर २०१५ पर्यंत) 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages