मुख्याध्यापकांचे अधिवेशन आजपासून बदलापुरात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुख्याध्यापकांचे अधिवेशन आजपासून बदलापुरात

Share This

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व शैक्षणिक धोरणांवर चर्चा 
बदलापुरात राज्यातील शेकडो मुख्याध्यापक एकत्र येणार 
मुंबई (प्रतिनिधी) महारष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे ५५ वे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन उद्यापासून ठाणे जिल्ह्यातील बदलापुरात संपन्न होत असून या अधिवेशनात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, शासनाचे नवीन शैक्षणिक धोरणांसह इतर शैक्षणिक विषयांवर चर्चा होणार असून अनेक शैक्षणिक ठराव देखील मंजूर केले जाणार आहेत. 
१९ ते २१ नोव्हेंबर या तीन दिवसात बदलापुरातील म्हात्रे गार्डनच्या प्रांगणात हे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनासाठी राज्यभरातील मुख्याध्यापक येणार आहेत. 
१९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता अधिवेशनाचे अध्यक्ष महादेव मातोंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाने अधिवेशनाला सुरु होईल.सकाळी ११ वाजता मुख्याध्यापक कौन्सिल सभा घेण्यात येईल तर मुख्य उदघाटन सोहळा दुपारी ३ वाजता सुरु होईल या उदघाटन सोहळ्याला राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, कोकण शिक्षक मतदार संघाचे शिक्षक आमदार रामनाथ मोते, पदवीधर मतदार संघाचे निरंजन डावखरे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी ७ वाजता नियामक मंडळाची सभा होईल. 

२० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या विषयावर पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ सादरीकरण करील. १०.३० वाजता आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. दुपारी २ वाजता शाळांची संचमान्यता या विषयावर जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघ सादरीकरण करेल. दुपारी ४ वाजता सध्याचे शैक्षणिक धोरण व त्यातील अडचणी या विषयावर शिक्षक आमदार रामनाथ मोते मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करतील ५ वाजता शिक्षकांची उपक्रमशीलता या विषयावरकवी अशोक बागवे आपले मत मांडणार आहेत. ५. ३० वाजता शासनाचे शैक्षणिक धोरण व अंमलबजावणी या विषयावर राज्याचे शालेय शिक्षण उपसचिव गुट्टे मुख्याध्यापकांना संबोधित करतील. संध्याकाळी ७ वाजता शालेय विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. 
२१ नोव्हेंबर समारोपाच्या दिवशी सकाळी ९ वाजता खुले अधिवेशन संपन्न होणार असून या अधिवेशनात अनेक शैक्षणिक ठराव मंजूरकरण्यात येणार आहेत या समारोपाला माजी मंत्री गणेश नाईक, शिक्षण आयुक्त पुरषोत्तम भापकर, शिक्षण संचालक नामदेव जरग, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे उपस्थित राहणार आहेत. दुपारी १ वाजता स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होऊन अधिवेशनाचा समारोप होईल.
 
या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष कुळगाव-बदलापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष वामन म्हात्रे आहेत. ठाणे, मुंबईसह राज्यातील सर्व मुख्याध्यापकांनी या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य संयोजक व ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे, सचिव प्रवीण पाटील, मुंबई विभागाचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, राज्याचे उपाध्यक्ष संदीपान मस्तूद यांनी केले आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages