पोलिसांनी आक्षेपार्ह 72 संकेतस्थळ केल्या ब्लॉक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 December 2015

पोलिसांनी आक्षेपार्ह 72 संकेतस्थळ केल्या ब्लॉक

मुंबई : सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर अपलोड करून कायदा व सुव्यवस्था बिघडवू पाहणाऱ्या तब्बल 72 साइट्‌स मुंबई पोलिसांनी ब्लॉक केल्या आहेत. 11 महिन्यांत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. नववर्षानिमित्त होणाऱ्या पार्ट्यांची आमंत्रणे ऑनलाइन पाठवली जातात. त्यावर पोलिस लक्ष ठेवून आहेत.

माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात तरुण पिढी सोशल मीडियाचा अधिक वापर करते. त्याचे फायदे तसेच तोटेही आहेत. पोलिसांना होणारी मारहाण, भ्रष्टाचार किंवा रेल्वेतील अपघातांचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर अपलोड केले जातात. त्यानंतर त्याची चर्चा होते. गुन्हे शाखेच्या सायबर लॅबमधील अधिकारी सोशल मीडियावर अपलोड होणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवून असतात. 11 महिन्यांत पोलिसांनी फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल साइटवर अपलोड झालेल्या 72 साइट्‌स ब्लॉक केल्या. संत-महात्मे, राष्ट्रपुरुषांच्या फोटोंचे बिडंबन, हिंदू-मुस्लिमांविषयी आक्षेपार्ह लेखन आदी कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS