"दप्तर' कमी करा; अन्यथा कारणे दाखवा नोटीस - प्राथमिक शिक्षण विभागा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 December 2015

"दप्तर' कमी करा; अन्यथा कारणे दाखवा नोटीस - प्राथमिक शिक्षण विभागा

मुंबई : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजना न करणाऱ्या शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची तयारी प्राथमिक शिक्षण विभागाने सुरू केली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शाळांमध्ये अचानक भेटी देण्यात येतील. त्यात जर अशी शाळा आढळून आली, तर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल. तसेच दप्तराचे ओझे नियंत्रणात ठेवण्यासाठी कल्पक उपाययोजना करणाऱ्या शाळांना अभिनंदनपर पत्र देण्यात येईल, अशी माहिती प्राथमिकचे शिक्षण संचालक महावीर माने यांनी दिली. 

उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दप्तर ओझेप्रकरणी अंमलबजावणीसाठी 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती. शाळांना त्या-त्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी, तसेच शिक्षण उपसंचालकांकडून यापूर्वीच या संदर्भातली पत्रे गेली आहेत. आता पुढील आठवडाभरात शाळा या संदर्भात प्रत्यक्ष काय उपाययोजना करताहेत त्याकडे शिक्षण विभाग गांभीर्याने लक्ष देणार आहे. राज्य सरकारने दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी काय करता येईल, या संदर्भात उपाययोजना सुचवणारा सरकारी आदेश यापूर्वीच जारी केला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या वजनानुसार त्याच्या 10 टक्‍क्‍यांपर्यंत दप्तराचे वजन किती असावे, याचा तक्ताही दिला आहे. कमीत कमी तीन किलो वजन अपेक्षित आहे; मात्र ते विद्यार्थ्याच्या वजनाच्या 10 टक्‍क्‍यांहून अधिक नसावे, असे या आदेशामध्ये म्हटले आहे.

इयत्ता - विद्यार्थ्याचे वजन कि.ग्रॅम - 

सर्व साहित्यासह दप्तराचे अपेक्षित वजन कि.ग्रॅम
पहिली- 20.1 - 2.10
दुसरी- 22.35 -2.235
तिसरी- 25.05 - 2.505
चौथी- 28.3 - 2.830
पाचवी- 31.95 - 3.195
सहावी- 32.95 - 3.295
सातवी- 37.85 - 3.785
आठवी- 42.45 - 4.245 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad