कुर्ला परिसरातील 'किनारा उपहारगृह' दुर्घटेनेबाबत ०४ कर्मचा-यांवर कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 December 2015

कुर्ला परिसरातील 'किनारा उपहारगृह' दुर्घटेनेबाबत ०४ कर्मचा-यांवर कारवाई

होटेल मालकाला अटक
मुंबई / प्रतिनिधी - कुर्ला परिसरातील किनारा उपहारगृहात १६ ऑक्टोबर २०१५ रोजी झालेल्या दुर्दैवी घटनेबाबत उपायुक्त (परिमंडळ - ५) भरत मराठे यांची विशेष चौकशी समिती नेमण्यात आली होती. सदर चौकशी समितीने किनारा उपहारगृह दुर्घटनेबाबत सर्वंकष चौकशी करुन याबाबतचा अहवाल महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे सादर केला आहे. सदर अहवालानुसार किनारा उपहारगृहात दुर्घटनेबाबत महापालिकेच्या ०४ कर्मचा-यांवर कर्तव्यात कसुर केल्याबाबत ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार सदर कर्मचा-यांच्या निलंबनाची शिफारस करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी स्वीकारला आहे.

किनारा उपहारगृह दुर्घटनेबाबत महापालिकेच्या 'एल' या प्रशासकीय विभागातील संबंधित चार कर्मचा-यांच्या निलंबनाची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये राजेंद्र राठोड कनिष्ठ अभियंता, दोन स्वच्छता निरीक्षक दिपक भुरके, विनोद चव्हाण व तुलशीदास वाघवले मुकादम यांचा समावेश आहे. किनारा उपहारगृहास गॅस सिलिंडर्सचा पुरवठा करणा-या कंपनीद्वारे संबंधित वितरक व संनियंत्रण करणारे संबंधित कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, असेही चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार कार्यवाही करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत देखील संबंधित गॅस सिलिंडर्स पुरवठादार कंपनीला महापालिकेद्वारे कळविण्यात येणार आहे. दरम्यान या दुर्घटने प्रकरणी सिटी किनारा होटेलचे मालक सुधीर हेगड़े याना अटक करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS