महापरीनिर्वाण दिनानिमित्त बेस्टच्या जादा बसगाड्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापरीनिर्वाण दिनानिमित्त बेस्टच्या जादा बसगाड्या

Share This
मुंबई / प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे अभिवादान करण्यास येणाऱ्या लाखो भाविकांसाठी दिलासा देण्यासाठी बेस्ट प्रशासनाद्वारे याही वर्षी विशेष जादा बस गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ८ नंतर २४१, ३५१, ३५४ आणि १६ मर्यादित बसमार्गावर ज्यादा बस गाड्या चालवण्यात येणार आहेत. तसेच ६ डिसेंबर रोजी पाहते ६ वाजल्या पासून २७, ५३, ६३, ९३, १६५, २४१, ३०५, ३५४, ३५७, ३८५ आणि ५२१ मार्गावर ३५ जादा बसगाड्या चालवल्या जाणार आहेत. प्रवाश्यांच्या सोयी साठी निरीक्षक आणि वाहतूक अधिकारी यांची नेमणूक करण्यात येणार आहेत. शिवाजी पार्क बस चौकी आणि शिवाजी पार्क येथील बेस्टच्या बुथवर दैनंदिन बसपासची विक्री करण्यात येणार आहे. प्रवाश्यांनी बेस्टच्या जादा बस गाड्यांचा आणि दैनंदिन बस पासचा लाभ घ्यावा असे आवाहन बेस्ट प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages