मुंबई महापालिकेने आठ महिन्यांत अर्थसंकल्पातील फक्त २१ टक्केच निधी केला खर्च - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई महापालिकेने आठ महिन्यांत अर्थसंकल्पातील फक्त २१ टक्केच निधी केला खर्च

Share This
मुंबई  :  सर्वात मोठा अर्थसंकल्प असणाऱ्या मुंबई महापालिकेने अर्थसंकल्पातील 
आठ महिन्यांत फक्त २१ टक्केच निधी खर्च केला असल्याचे उघड झाले आहे. पालिकेच्या विविध विभागातील दैनंदिन कामे व मोठ्या प्रकल्पांसाठी तब्बल ११ हजार ८१६ कोटीची तरतूद केली होती त्यातील फक्त अडीच हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. 

महापालिकेने २०१५ ते २०१६ या आर्थिक वर्षासाठी ३३ हजार कोटीचा निधी निश्चित केला होता. त्यातील प्रकल्पासाठी ११ हजार ८१६ कोटीची तरतूद करण्यात आली. त्यातील दोन लाख ५५२ कोटी म्हणजे फक्त २१ टक्के निधी खर्च झाला. दरवर्षी पालिकेचा हजार कोटीचा अर्थसंकल्प सादर केला जातो. त्यातील ५० टक्के निधीही खर्च होत नाही. यंदा तर पाव टक्काही खर्च झालेला नाही. पुढील तीन महिने १५ टक्के खर्च केला केला तर यंदाच्या आर्थिक वर्षासाठी ३० ते ३५ टक्केच निधी खर्च होऊ शकतो. याबाबत विरोधीपक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी जोरदार आक्षेप घेतला असून येत्या पालिका सभागृहात विरोधी पक्षाकडून  प्रशासनाला धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे. पालिकेचा मोठा अर्थसंकल्प सादर केला गेला असला तरी तेवढा खर्च केला जात नसल्याने अनेक प्रकल्प, नागरी सुविधांची बोंब कायम राहणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages