दोन दिवसांत ४०६ अनधिकृत स्टॉल्सवर कारवाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दोन दिवसांत ४०६ अनधिकृत स्टॉल्सवर कारवाई

Share This
मुंबई   :  मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पश्चिम उपनगरांतील सलग दोन दिवसांत ४०६ अनधिकृत स्टॅाल्सवर कारवाई केली. स्टॉलधारकांनी पालिकेने परवानगी दिलेल्या जागेपेक्षा अधिक जागेवर अनधिकृत स्टॉल्स उभारून जागा व्यापल्या होत्या. अतिक्रमणे तोडल्याने येथील अतिक्रमणाने व्यापलेली जागा मोकळी झाली आहे. 

पालिकेने एच/पश्चिम विभागामध्ये २५२ स्टॉल्सवर व  के/पश्चिम विभागामध्ये १५४ स्टॉल्सवर कारवाई करण्यात आली. धडक कारवाईत अतिरिक्त बांधकाम, बांबू - ताडपत्री - सिमेंटचे पत्रे लावून केलेले अतिक्रमण हटविण्यात आले. तसेच स्टॉल्सच्या समोरील बाजूस झडपा व इतर बांधकामे तोडण्यात आली. कारवाई दरम्यान स्टॅालमध्ये असलेले साहित्यही पालिकेने जप्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages