Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

लोकलमधील डब्यातील आसनांच्या रचनेत बदल

मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 22 Dec 2015   
लोकलमधील अपघात कमी करण्यासाठी प्रशासनाने डब्यातील आसनांच्या 
रचनेत बदल केला आहे. नवी आसन व्यवस्था मेट्रोप्रमाणे करण्यात आली आहे. 
परिणामी, आता मुंबईकरांना लोकलचा प्रवास उभ्याने करावा लागणार आहे. 
आज या दोन आसनी लोकलची चाचणी घेण्यात आली. 
मध्य रेल्वेच्या माटुंगा येथील कार्यशाळेत लोकलच्या पाच डब्यांतील 
आसन व्यवस्था बदलण्यात आली आहे.

मात्र महिला, अपंग, मालडबा, प्रथम वर्गाच्या आसन व्यवस्थेत बदल करण्यात
आलेला नाही. केवळ पुरुषांच्या द्वितीय वर्गाच्या डब्यातील आसन व्यवस्थेत बदल
करण्यात आला आहे. माटुंगा कार्यशाळेतून मंगळवारी हे डबे कुर्ला कारशेडकडे रवाना
करण्यात आले आहेत. आता या लोकलची तांत्रिक चाचणी घेण्यात येणार असून, 
त्यानंतर ही लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस 
ते कल्याण स्थानकांदरम्यान ही लोकल चालविण्यात येणार आहे. 

प्रवाशांच्या प्रतिक्रिया आणि सूचना मागविण्यात येतील; आणि त्यानुसार केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू 
यांना खासदारांकडून एक अहवाल पाठविण्यात येईल. ही आसन व्यवस्था मुंबईकरांच्या पचनी पडली 
तरच टप्प्याटप्प्याने लोकलमधील आसन व्यवस्थेत बदल करण्यात येतील. रूळ ओलांडताना होणारे 
अपघात टाळण्यासाठी तसेच लोकलमधून चढता-उतरताना होणारे अपघात कमी व्हावेत यासाठी 
रेल्वेतर्फे विशेष प्रयत्न केले जात आहेत.

प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याबरोबरच लोकलमधून उतरताना मधल्या अंतराकडे लक्ष देण्याची सूचना
 करण्याची घोषणा रेल्वेतर्फे दिली जात आहे. लोकलच्या वाढत्या गर्दीवर आणि धावत्या लोकलमधून
 पडून होणाऱ्या अपघातांवर उपाय शोधले जात आहेत. आता या नव्या लोकलमध्ये उभे राहणाऱ्यांना 
अधिक जागा मिळून जास्त प्रवासी सामावून घेतले जातील असे सांगण्यात येत आहे. अर्थात 
कार्यालयीन वेळेस ही लोकल चालवून पाहिल्यानंतर तिच्या कार्यक्षमतेचा अंदाज येऊ शकेल.

गेली अनेक वर्षे प्रवासी संघटना धावत्या लोकलमधून पडून होणारे अपघात टाळण्यासाठी तोडगा काढा, 
अशी मागणी रेल्वेकडे करत आहेत. कदाचित हा दोन आसनी रेल्वेचा प्रयोग यशस्वी झाल्यास 
मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळेल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom