Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

दामू नगरमधे दलित वस्ती असल्याने आग लावली गेली - संजय निरुपम

स्मार्टसिटी उद्योजक, बिल्डर व विकासक यांच्या फायद्यासाठीच
कांदिवली पूर्व येथील दामुनगर येथे जी आग लागली, ती बिल्डरने भूखंडासाठी लावलेली आहे असा मला संशय आहे. ही जागा वनजमिनीची नसून विश्व हिंदू परिषदेच्या अखत्यारित काम करणाऱ्या गोरक्ष मंडळ या खाजगी ट्रस्टची आहे. हे आगीचे कारस्थान बिल्डर व भाजपा सरकारचे आहे अशी मला शंका आहे असे कोंग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


दामुनगर येथील आगीत १५०० झोपडपट्ट्या जळून खाक झाल्या आहेत. एकही झोपडी तिथे वाचली नाही. तेथे ९०% दलित समाज राहायचा. अजूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तेथे फिरकले देखील नाहीत. स्थानिक आमदार रहिवाश्यांचे स्थलांतर करण्याच्या मार्गावर आहेत. भाजपा सरकारने रुपये ३,८०० एवढी तुटपुंजी रक्कम प्रत्येक रहिवाशाला चेकने दिली आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशी प्रचंड नाराज झालेले आहेत. काँग्रेस सरकारने आमच्या काळात अशा काही घटना घडल्यावर रुपये ५ हजार ते २५ हजार असा भरघोस मोबदला दिला होता. संजय निरुपम पुढे म्हणाले की काँग्रेसने अशी मागणी केली आहे की दामुनगर येथील रहिवाश्यांना ताबडतोब शेड बांधून द्यावी व त्यांचे त्या जागेवरच पुनर्वसन लवकरात लवकर करावे. तसेच सर्वांना प्रत्येकी रुपये २५ हजार असा मोबदला द्यावा. अन्यथा काँग्रेसतर्फे स्थानिक रहिवाश्यांना घेवून मोठे आंदोलन करू, रस्त्यावर उतरू, तसेच २१ डिसेंबर पासून त्या जागेवरच उपोषणाला बसू. सुरवातीला हे उपोषण सांकेतिक असेल. तरीही सरकारने मदत केली नाही तर मग मी स्वतः आमरण उपोषण करेन असा इशारा निरुपम यांनी दिला आहे.

मुंबई महानगरपालिकेचे मुंबईसाठीचे बजेट ३५ हजार कोटींचे आहे. तिथे भाजपा सरकार स्मार्टसिटीसाठी १०० कोटींचे गाजर दाखवून स्मार्टसिटी बनवू पाहते, याला काँग्रेसचा विरोध आहे. अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले की मुंबईतील लोअर परेल भागात ही स्मार्टसिटी उभारणार ते तेथील उद्योजक, बिल्डर व विकासक यांचा फायदा करण्यासाठीच ही स्मार्टसिटीची योजना आहे. सरकारची आणि बिल्डरांची ही हातमिळवणी आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिकेत याला कडाडून विरोध केला होता. मुंबईच्या रस्त्यांसाठी महापालिका २ हजार कोटी वर्षाला खर्च करते. नालेसफाईसाठी १५० कोटी खर्च करते, तसेच हॉस्पिटलसाठी व आरोग्यासाठी २ हजार कोटी खर्च करते. तिथे स्मार्टसिटीसाठी फक्त १०० कोटी देऊन भाजपा सरकारला काय साध्य होणार आणि हे कसे शक्य आहे याची मला शंका वाटते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आधी स्मार्टसिटीला विरोध करतात व मग नंतर एका रात्रीत मुख्यमंत्र्यांची बोलणी झाल्यावर स्मार्टसिटीला पाठींबा देतात. या दोघांमध्ये काहीतरी मोठी वाटाघाटी झाली आहे. या दोघांचेच साटेलोटे आहे अशी माझी खात्री आहे. SVP (एस व्ही पी) Special Purpose Vehicle मध्ये कोण-कोण येणार आहेत तेच अजून स्पष्ट नाही. SVP मधेही सर्वात मोठा घोटाळा आहे.

ते पुढे म्हणाले की स्मार्टसिटीला शिवसेनेने काही अटींवर पाठींबा दिला. त्यातील पहिली अट ६० लाख भूमिपुत्रांना रोजगार मिळणार. हे ६० लाख जॉब्स कुठून व कसे मिळणार ते शिवसेनेने जनतेला स्पष्ट करून सांगावे. ६० लाख जॉब्स स्मार्टसिटीत शक्यच नाही. कुठून भाजपा सरकार व शिवसेना देणार आहे ते स्पष्ट करावे. अशा काही कारणांसाठीच काँग्रेसचा स्मार्टसिटीला विरोध आहे.

मेट्रो दरवाढी विरोधात रिट याचिका दाखल
==========================
संजय निरुपम यांनी मेट्रो दरवाढीचा विरोध करत मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. मेट्रो दरवाढ हे भाजपा आणि रिलायन्स चे साटेलोटे आहे. मेट्रो एक्टच्या नावाखाली रिलायन्स नेहमी दरवाढ करते. हा मुंबईच्या जनतेवर होणारा अन्याय आहे. ही दरवाढ कायमची टळावी. म्हणून मी याचिका दाखल केली आहे. भाजपा सरकार रिलायन्सवर मेहेरबान आहे. मेट्रो दरवाढी संदर्भात कोर्टात १७ डिसेंबर ला तारीख आहे अशी माहिती निरुपम यांनी दिली.      

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom