पर्ल्सच्या गुंतवणूकदारांचे आझाद मैदानात आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 December 2015

पर्ल्सच्या गुंतवणूकदारांचे आझाद मैदानात आंदोलन

पीएसीएल (पर्ल्स) या कंपनीत ४९ हजार कोटी रूपये अडकलेल्या गुंतवणूकदारांपैकी राज्यात एक कोटी गुंतवणूकदार असून यातील हजारो गुंतवणूकदारांनी मंगळवारी आझाद मैदानात धडक दिली. सेबीने या वित्त व्यवहाराचे नियंत्रण करणा-या सरकारी यंत्रणेने पर्ल्स कंपनीने सर्व गुंतवणूकदारांचे पैसे ४५ दिवसांच्या आत परत करण्याचे आदेश दिल्यानंतरही आत्तापर्यंत एक रूपया या गुंतवणूकदारांना मिळाला नसल्याने याविरोधात या गुंतवणूकदारांनी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. 

देशभरात सहा कोटी गुंतवणूकदारांचे पीएसीएल (पर्ल्स) या चक्रानुवर्ती गुंतवणूक कंपनी या कंपनीत ४९ हजार कोटी रूपये अडकले आहेत. सर्व गुंतवणूकदारांचे ४९ हजार कोटी रूपये पर्ल्स कंपनीच्या चक्रानुवर्ती गुंतवणूक योजनांमध्ये बुडालेले आहेत. त्यावर सेबीने पर्ल्स कंपनीने सर्व गुंतवणूकदारांचे पैसे ४५ दिवसांच्या आत परत करण्याचे आदेश १२ ऑगस्ट रोजी दिले आहेत. मात्र त्यानंतरही या कंपनीकडून आत्तापर्यंत पैसे परत करण्यात आले नसल्याने गुंतवणूकदारांकडून हे धरणे आंदोलन करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय पीएसीएल (पर्ल्स) गुंतवणूकदार संघटनेचे निमंत्रक कॉ. विश्वास उटगी यांनी दिली.
PEARL

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad