विधानपरिषद निवडणुक - भाई जगताप यांना समाजवादी पक्षाचा पाठिंबा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विधानपरिषद निवडणुक - भाई जगताप यांना समाजवादी पक्षाचा पाठिंबा

Share This
मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 19 Dec 2015
विधानपरिषद निवडणुकीसाठी मुंबईमधून रिंगणात उतरलेले कॉंग्रेसचे आमदार भाई जगताप यांना समाजवादी पक्षाचा पाठींबा असल्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांनी हे जाहीर केले आहे. देशातील सध्याच्या परिस्थितीत जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष शक्तींना बलशाली करण्याची गरज आहे, त्यामुळे कॉंग्रेसच्या जगताप यांना समर्थन देत आहोत, असे आझमी म्हणाले. 27 डिसेंबरला ही निवडणूक होणार आहे. मुंबई महापालिकेत समाजवादी पक्षाचे आठ नगरसेवक आहेत. शिवसेनेकडून या निवडणुकीत पर्यावरण मंत्री रामदास कदम व अपक्ष म्हणून प्रसाद लाड रिंगणात आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages