आफ़ताब खान यांची कर्णावर्त रोपण शस्त्रक्रिया केव्हा होणार ? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 December 2015

आफ़ताब खान यांची कर्णावर्त रोपण शस्त्रक्रिया केव्हा होणार ?

मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 19 Dec 2015
अली यावरजंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्थान, मुंबई तर्फे कर्णावर्त रोपण शस्त्रक्रिया ( Cochlear Implants Surgery ) यासाठी 4 वर्षीय आफ़ताब आलम खान यांचे कुटुंब प्रतिक्षेत आहे की त्यांच्या मुलाची रोपण शस्त्रक्रिया होताच त्यास ऐकण्यास येईल. परंतु केंद्र सरकारच्या लालफीताशाही मुळे गेल्या 1 वर्षापासून तारखेवर तारीख मिळत आहे. या सर्व प्रकरणाची तक्रार आरटीआय कार्यकर्ता अनिल गलगली यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावर चंद गहलोत यांस करत अश्या संवेदनशील प्रकरणात होणारी दिरंगाई लक्षात घेता गरीबांना न्याय आणि निष्काळजीपणा दाखविणा-या अधिकारी आणि डॉक्टरावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


मुंबई येथील साकीनाका निवासी अब्दुल रहीम खान यांचा 4 वर्षाचा मुलगा आफ़ताब आलम खान  20 नोव्हेंबर 2014 पासून आजमितीपर्यंत कर्णावर्त रोपण शस्त्रक्रिया (Cochlear Implants Surgery) साठी परिश्रम घेत आहे. अली यावरजंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्थान, मुंबई  यांनी दिनांक 17 डिसेंबर 2014 रोजी त्यांच्या मुलाच्या सर्जरीस मंजूरी दिली आणि दिनांक 12 फेब्रुवारी 2015 रोजी पत्र पाठवून नायर रुग्णालय येथील डॉ बछि हाथीराम यांस संपर्क करण्यास सांगितले. तेथे 6 वेळा डॉ बछि आणि डॉ विकी यांनी मुलास पाहिले आणि ज्यासाठी त्यांस 45 वेळा जाण्याची पाळी आली. येथून एक अहवाल बनवून त्यास अली यावरजंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्थान, मुंबई यांस पाठविला. येथे पुन्हा नव्याने टेस्ट करण्यात आली. भाजपाचे खासदार डॉ किरीट सोमैया यांनी 20 मे 2015 रोजी पत्र पाठवून 26 मे 2015  रोजी मलबार हिल येथील राजभवन मध्ये निमंत्रित केले जेथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मुलाच्या दोन्ही कानात जी मशीन लावली गेली आहे त्याची किंमत 13,500 रुपये आहे ज्यासाठी चित्रपट अभिनेता सलमान खान आणि अरबाज खान यांनी 10,000 रुपये दिले आहे. मशीन मुळे काहीच लाभ न झाल्यानंतर कर्णावर्त रोपण शस्त्रक्रियेची ( Cochlear Implants Surgery) आवश्यकता सांगितली. अश्या प्रकारे एक लहानश्या सर्जरीसाठी गेल्या 1 वर्षापासून केंद्र सरकारची संस्था अली यावरजंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्थान, मुंबई ही कुटुंबियास पळवत आहे. याशिवाय कल्याण निवासी शाकिर बेग यांचा मुलगा हसनेन आणि मुलगी  हमजा यांस गेल्या 8 महिन्यापासून ये-जा करण्यास सांगत आहे. अनिल गलगली यांच्या मते केंद्र सरकारची मदत करण्याची कुवत नसेल तर स्पष्टपणे सांगितले पाहिजे यामुळे 4 वर्षाच्या मुलाचे आयुष्याशी खेळ खेळला जात आहे. असे किती प्रकरणे असतील जे केंद्र सरकारची लवचिक व्यवस्था आणि लालफीताशाहीला बळी पडत आहे. हा तर अपंगाचा अपमानसारखाच आहे. अश्या प्रकरणात सीमा निश्चित करणे आवश्यक आहे ज्यामुळे अपंग व्यक्ती दुसरा पर्याय शोधु शकतील, अशी मागणी अनिल गलगली यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad