Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

मुंबई महापालिका आता घेणार तीन लाख कचरापेटया

मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 28 Dec 2015   
मुंबईच्या रर-तांवर , गलोगल्लीत आणि वसाहतीमध्ये कचरा दिसणार नाही कारण पालिका आता कच-याची समस्या लवकरच सोडवण्यासाठी पुढे सरसावली सन 2015 -16 व 2016 - 17 या एक वषाॅच्या कालावधीसाठी दहा लिटर क्षमतेच्या एच .डी .पी .ई च्या बंदिस्त तीन लाख कचरापेटया घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे यासाठी पालिका चक्क तीन कोटी 21 लाख रुपये खर्च करणार आहे हा खर्च नगरसेवक निधीतून केला जाणार आहे तसा प्रर-ताव पालिकेने तयार केला असून र-थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर केला आहे. 

नागरी घन कचरा नियम 2000 चे पालन करण्याकरीता तसेच नागरी वसाहतीतील नागरिकांना ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा संकलीत करण्याकरीता प्रोत्साहन देण्यासाठी दहा लिटर क्षमतेच्या एच. डी. पी. ई च्या बंदिस्त कचरापेटयांचा पुरवठा नगरसेवकांच्या मागणी नुसार नगरसेवक निधीतून करण्याकरीता एक वषाॅच्या कालावधीकरीता खरेदी करण्यासाठी दरकंत्राट बनविले आहे या कचरापेटया एच .डी .पी. ई या कच्च्या मालापासून बनविलेल्या आहेत सदर पेटया सहजपणे उचलता येणार असून रिकाम्याही करता येणार आहेत नगरसेवक या प्रकारच्या  कचरापेटया त्यांच्या नगरसेवक निधीतून खरेदी करून विविध नागरी वसाहतीना ओला व सुका कचरा वेगवेगळ्या बंदिस्त कचरापेटयांमध्ये साठविण्यास प्रेरित करण्यासाठी आग्रही असून पालिका अश्या पकारच्या दहा लिटर क्षमतेच्या च्या बंदिस्त कचरापेटया पहिल्यांदाच घेत आहे सवॅ विभागातील नगरसेवकांसाठी मिळून एकत्रितरीत्या सुमारे तीन लाख नगरसेवक ठरविण्यात आले आहे बाजार भावानुसार 150 रुपये प्रति नग याप्रमाणे पालिका तीन लाख कचरापेटया घेणार आहे मागील वर्षी पालिकेने खरेदी केलेल्या 120 व 240 लिटर क्षमतेच्या बंदिस्त कचरापेटयांच्या बाबतीत सुध्दा एक वषाॅचा हमी कालावधी घेतला होता पालिका या कचरापेटया मे. मॅक एनव्हायरोटेक एॅण्ड सोल्युशन ( इंडिया ) प्रा . लि या कंपनीकडून घेणार आहे त्यासाठी पालिका चक्क तीन कोटी 21 लाख रुपये खर्च करणार आहे तसा प्रर-ताव पालिकेने तयार केला असून र-थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर केला आहे त्यामुळे मुंबईच्या रर-तांवर आता कचरा दिसणार नाही या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिका आता पुढे सरसावली आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom