विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 December 2015

विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर

मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 30 Dec 2015   
विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर
झाले आहेत. नागपूर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गिरीश व्यास
यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित 7 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत
मुंबई स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या 2 जागांसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे
उमेदवार अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप आणि शिवसेनेचे उमेदवार रामदास
गंगाराम कदम यांची निवड झाली आहे. त्यांना अनुक्रमे 64 आणि 86 मते मिळाली.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार सतेज उर्फ बंटी. डी. पाटील यांची निवड झाली.
पाटील यांना 220 तर अपक्ष उमेदवार महादेवराव महाडिक यांना 157 मते मिळाली.
धुळे-नंदुरबार मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अमरीशभाई रसिकलाल पटेल
यांची निवड झाली. पटेल यांना 352 तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. शशिकांत
वाणी यांना 31 मते मिळाली.

अहमदनगर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुणकाका बलभीम जगताप विजयी झाले.
जगताप यांना 243, भाजप-शिवसेना युतीचे शशिकांत गाडे यांना 177, अपक्ष उमेदवार
जयंत ससाणे यांना 1 व अपक्ष उमेदवार मच्छिंद्र सुपेकर यांना शून्य मते मिळाली. अकोला
मतदारसंघातून शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया विजयी झाले. त्यांना 513 तर राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र सपकाळ यांना 239 मते मिळाली. सोलापूर मतदारसंघातून
भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रशांत परिचारक विजयी झाले. त्यांना 261 मते मिळाली
तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीपक साळुंखे यांना 120 मते मिळाली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad